Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उजनी जलाशयात पंडी अन् वडपने मासेमारीस परवानगी द्यावी; हर्षवर्धन पाटील यांना मच्छिमार बांधवांचे निवेदन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 8 February 2024, 11:39

सागर जगदाळे

 

भिगवण : उजनी धरण व्यवस्थापन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील आदेशानुसार २९ नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून उजनी जलाशयातील लहान मासळी मासेमारी करण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने वडप आणि पंडीच्या सहाय्याने मासेमारी करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मच्छिमार भोई समाज बांधवांनी शहाजीनगर येथे मंगळवारी (ता. ६) दिले.

दरम्यान, राज्याचे मस्त्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार व उपमुख्यमंत्री तसेच जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनखाली मच्छीमारांचा हा प्रश्न सोडविला जाईल, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी मच्छीमार बांधवांना दिली.

दरम्यान, मच्छीमार बांधवांनी आपल्या तक्रारींचा पाढा हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर वाचला. तक्रारवाडी येथील श्री वर्धनी मत्स्य व्यवसाय सहकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही आमच्या मागण्यांचे निवेदन प्रादेशिक उपायुक्त, मस्त्यव्यवसाय विभाग, पुणे व कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर यांना दिले आहे. मात्र, दोन्ही विभाग टोलवाटोलवी करीत असल्याची तक्रार त्यांनी केली.

उजनी जलाशय परिसरातील आम्ही रहिवासी व पारंपरिक मच्छिमार आहोत. आमचा वडिलोपार्जित पारंपरिक मासेमारी व्यवसाय आहे. आम्ही भूमीहीन असल्यामुळे आमचे उपजिवीकेचे साधन केवळ मासेमारी आहे. उजनी धरण तयार होण्यापूर्वीपासून आम्ही भीमा नदीवर मासेमारी करून आमची उपजिवीका केली आहे. उजनी धरण झाल्यापासून याच धरणावर वडप आणि पंडीच्या सहाय्याने मासेमारी करून उपजिवीका करीत आहोत. या कालावधीत कधीच आम्हाला वडप आणि पंडीच्या सहाय्याने मासेमारी करण्याचे बंधन घातले नव्हते. मात्र, आता बंधन घालण्यात आल्याचे भोई समाज बांधवांनी याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांना सांगितले.

या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी हा प्रश्न निश्चितपणे तातडीने मार्गी लावू, असे आश्वासन भोई समाज बांधवांना दिले. या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत वाघ यांच्यासह गणेश गजरे, रामभाऊ (आण्णा) जाधव, संतोष परदेशी, मनीष परदेशी, दगडू परदेशी, तलाश परदेशी, गणेश परदेशी, कमलेश परदेशी, किरण कांबळे, मनोज परदेशी, विनोद मोरे, सूर्याजी मोरे, नंदू परदेशी, संदीप मोरे, अमर मोरे आदी भोई समाज बांधव उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
30 candidates withdraw from Baramati, but elections will still be held; Abhijit Bichukale and Karuna Munde firmly in the fray!

बारामतीत 30 उमेदवारांची माघार, तरीही निवडणूक होणारच; अभिजित बिचुकले अन् करुणा मुंडे मैदानात ठाम!

Thursday, 9 April 2026, 19:49
Ashok kharat

Ashok kharat : धक्कादायक! अशोक खरातने नातेवाईक महिलेलाच जाळ्यात ओढले; 20 व्या वर्षी केला अत्याचार

Thursday, 9 April 2026, 19:36

गुपित माहिती अन् पोलिसांचा सापळा! बारामतीत तांब्याची तार चोरणारे गजाआड; ट्रान्सफॉर्मर ऑईल आणि तांब्याच्या तारा जप्त

Thursday, 9 April 2026, 19:26
Loni kalbhor

loni kalbhor : हवेली तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ‘जलतारा’ प्रकल्प राबविणे काळाची गरज – सभापती युवराज काकडे

Thursday, 9 April 2026, 19:10
Loni kalbhor

Loni kalbhor : कदमवाकवस्ती येथील भाजी विक्रेत्याची मुलगी बनली पोलीस! जिद्दीच्या जोरावर मोनाली जाधवची यशोगाथा

Thursday, 9 April 2026, 18:53
Next Post

उरुळी कांचन येथे एका ठिकाणी तर तरडे येथील गणपती मंदिरातील दानपेटीसह तीन ठिकाणी चोरी ; लाखोंचा मुद्देमाल लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.