Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : मराठा आरक्षण नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी; गोटेवाडी ग्रामस्थांचा निर्धार; तहसीलदारांना निवेदन

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Tuesday, 12 September 2023, 11:00

Pachgani News : पाचगणी : सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज १३ दिवस संपले तरी अद्याप आरक्षणप्रश्नी तोडगा निघालेला नाही. यातच येथील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी निषेध नोंदवण्यात आला. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मराठा बांधव एकवटले आहेत. कराड तालुक्यातील गोटेवाडी ग्रामपंचायतीने, मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात येईल, असा ठराव संमत केला आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाणार असल्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय 

गोटेवाडी (ता. कराड) ग्रामपंचायतीच्या वतीने कराड तहसीलदारांना निवेदन दिले असून, सर्व राजकीय पुढारी व राजकीय पक्षांना गाव बंदी करण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयाला विलंब होत असल्याने आता आंदोलनाची धार तीव्र होत आहे. मराठा आरक्षणासाठी सराटी येथे चालू असलेल्या उपोषणकर्त्या मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला व गोळीबार करण्यात आला. याच्या निषेधार्थ हा ठराव घेण्यात आला आहे.

अत्यंत शांततेत हे आंदोलन चालू असताना शासनाकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे पुढाऱ्यांनी गावामध्ये मते मागण्यासाठी, राजकीय सभेसाठी, उद्घाटनासाठी गावात येऊ नये, अशा पद्धतीचा ठराव गोटेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाकडून एकमताने घेण्यात आला. १० सप्टेंबर रोजी हा ठराव करण्यात आला. जोपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत सर्व राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे.

 

या ठरावावर ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत. या वेळी सरपंच डॉ. विलास आमले, सदस्य अनिल जाधव, जयवंत डुबल, अजित मोहिते, दशरथ जाधव, निळकंठ शेडगे आदींची उपस्थिती होती.

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post

Bhor News : कायद्यात रहाल, तर फायद्यात रहाल; भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.