Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तडीपार गुंड पवन बनेटीला गुन्हे शाखेच्या युनिट 4 कडून अटक; 2 पिस्टल आणि 2 काडतुसे जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 28 August 2025, 18:15

पुणे : पुण्यातील गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने केलेल्या कारवाईत कुख्यात बाबा शेख टोळीचा सदस्य असलेल्या तडीपार गुंडाला अटक करण्यात आली आहे. पवन देवेंद्र बनेटी (वय 24, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, पिंपळे गुरव, सांगवी) असे अटकेत घेतलेल्या गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 2 पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

 

पवन बनेटी हा पुण्यातील गुन्हेगारी जगतातला परिचित चेहरा आहे. बाबा शेख टोळीचा सक्रिय सदस्य म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. त्याच्याविरुद्ध आधीच दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदले गेले आहेत. याशिवाय, त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर पोलिसांनी त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र, तडीपार आदेश धुडकावून तो पुन्हा शहरात परतला आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगू लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

गुन्हे शाखेच्या युनिट 4 चे पथक अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर लक्ष ठेवून होते. दरम्यान, रेकॉर्डवरील तडीपार गुंड पवन बनेटी हा पिंपळे निलख परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याकडे पिस्तूल असल्याचाही सुगावा लागला. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक करण्यात यश मिळवले. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. सांगवी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, मयुरेश साळुंखे, संजय गवारे, प्रविण दळे, नितीन ढोरजे यांच्यासह पोलीस हवालदार कृणाल शिंदे, सुरेश जायभाये, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड आणि पोलीस अंमलदार प्रशांत सैद, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, रवी पवार, धनंजय जाधव यांनी सहभाग घेतला.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune

Pune : महागाईचा आणखी एक झटका! पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलमध्ये वाढ; खेडशिवापूर नाक्यावर आता मोजावे लागणार जादा पैसे

Saturday, 4 April 2026, 15:14
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Dream of becoming a police officer shattered! Took "shortcut" to get more marks; Candidate's protest at Daund SRPF ground

पोलीस बनण्याचं स्वप्न धुळीस! अधिक गुण मिळवण्यासाठी घेतला “शॉर्टकट”; दौंड एसआरपीएफ मैदानात उमेदवाराचा राडा

Saturday, 4 April 2026, 14:28
crime

crime : व्यावसायिकाचा संशयास्पद अंत, डोक्यावर जड वस्तूने वार, निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Saturday, 4 April 2026, 14:01

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! गुन्हेगाराशी मैत्री पोलीस शिपायाला पडली महागात अन् शेवटी घडलं तेच

Saturday, 4 April 2026, 13:50
Next Post

मानवीतेला काळीमा! मांत्रिकाच्या सांगण्यावरून काकाची विकृती; पुतण्याची हत्या करून शरीराचे तीन तुकडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.