Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोबी कोणी फुकटही घेईना..! भिगवण येथील हताश शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला रोटर..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 8 February 2023, 16:24

सागर जगदाळे

 

भिगवण : कोबी पिकाला सध्या कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे उभे पीक नागंरण्याची वेळ भिगवण (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांवर आली आहे. इंदापूर तालुक्यात टोमॅटो, कोबी, फ्लॅावर आदी तरकारी पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. यामध्ये कोबी, टोमॅटो या पिकांना कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या कोबी या पिकावरती रोटावेटर मारून कोबी पीक नष्ट केले आहे.

गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून कोबीचे दर हे अगदी कवडीमोल झाल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच आहे त्याचबरोबर केलेला खर्चही पूर्णपणे वाया गेला असल्याने कोबी पिक उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांनी एकरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च करून पीक घेतले आहे. मात्र, सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे गुंतवलेले भांडवलही वसूल होत नाही. मजुरी, वाहतूक खर्च देखील वसूल होत नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी कोबीच्या शेतांमध्ये रोटर फिरवला आहे. नगदी पीक म्हणून कोबी मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात. दीड महिन्यांपूर्वी कोबीला बाजारभाव चांगला मिळत होता. परंतु, त्यानंतर बाजारभावात मोठी घसरण होत गेली.

दरम्यान, खराब वातावरणामुळे पडलेल्या रोगामुळे केलेला खर्च वाया गेला. त्यातूनही कसेबसे हे कोबी पीक वाचविण्याचा प्रयत्न केला पण आधीच निसर्गाने साथ सोडलेली त्यात बाजारभावाने ही दगा दिला. बाजारभावातून कोबी पिकासाठी गुंतवलेले भांडवल वसुल काढणीची मजुरी व बाजारपेठेपर्यंत नेण्याचा वाहतुकीचा खर्च देखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कोबी पिकाची काढणी थांबवली आहे. काही शेतकऱ्यांना इतर पिके घ्यायची असल्याने त्या शेतामध्ये त्यांनी रोटर फिरवला आहे.

याबाबत बोलताना तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथील प्रयोगशील शेतकरी सुनील काळंगे म्हणाले, “कोबी चे पिक दहा गुंठे क्षेत्रात घेतले असून या पिकाला एकरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च आला. कोबीचे पीक घेतले होते. त्यासाठी रोपे, खते, औषध फवारणीसाठी हजारो रुपये खर्च केला. त्यातून पीकही जोमदार आले. परंतु, सुरुवातीपासूनच बाजारभाव मिळाला नाही. गुंतवलेले भांडवल अंगावर आले. त्यामुळे मी कोबीच्या पिकात रोटर फिरविण्याचा निर्णय घेतला. पिकासाठी केलेला खर्च वाया गेला आहे.”

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat

Pune : खरात यांच्या बेनामी मालमत्तांचे धागेदोरे पुण्यात! सीए ललित पोफळे यांच्या घरी ईडीचा छापा; छापेमारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 13 April 2026, 22:41
Pune

Pune : निवडणूक कामासाठी जाताना काळाचा घाला! पुण्यातील लोहगाव परिसरात अपघातात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू

Monday, 13 April 2026, 22:09
pune

Pune : अष्टविनायक भाविकांनो लक्ष द्या! रांजणगावचे महागणपती मंदिर 15 एप्रिलपासून साडेतीन महिने बंद; ‘हे’ आहे मुख्य कारण

Monday, 13 April 2026, 21:54

Crime : चल तूला पोहायला शिकवतो, म्हणत वडिलांनी मुलाला पोहायला नेलं. पण सराव जीवावर बेतला.. सिद्ध नदीकाठची घटना

Monday, 13 April 2026, 21:19
Loni kalbhor

Loni kalbhor : हवेली ‘सभापती’ चा पानंद व शेतरस्त्याचा पॅटर्न महसूल विभाग राज्यभर राबविणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची लोणीकंद येथे घोषणा

Monday, 13 April 2026, 19:01
Hadpasar 

Hadpasar : मद्यधुंद कार चालकाकडून किरकोळ वादातून बस चालकाला चिरडून मारले, उरुळी देवाची परिसरातील घटना ; आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 18:52
Next Post
Beautiful Photo of handshake of a newly married Couple In India, promising each other love and affection for the rest of their life.

चारचाकी गाडीसाठी केले दुसरे लग्न, अन पहिल्या पत्नीला दिला तोंडी तलाक ; पिंपरी पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.