Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘जय सियाराम’चा नारा देत तब्बल पाच लाखांहून अधिक पिंपरी-चिंचवडकरांनी काढली रथयात्रा

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 22 January 2024, 18:30

पिंपरी : अत्यंत भक्तीमय…भगवामय…आणि मंगलमय वातावरण…फुलांचा वर्षाव अन्‌ ढोल-ताशांच्या निनादामध्ये चौका-चौकात होणारे स्वागत…फटाक्यांची तूफान आतिषबाजी आणि ‘जय सियाराम’चा गगनभेदी नारा…अशा उत्साहाच्या आणि भक्ती-भावाच्या वातावरणात तब्बल पाच लाखांहून अधिक पिंपरी-चिंचवडकर रामभक्तांनी सहभागी होत महाराष्ट्रातील सर्वात मोठी रथयात्रा यशस्वी केली.

 

राम जन्मभूमी अयोध्येतील श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी भव्य ‘रथयात्रा’ आयोजित केली होती. त्याला रामभक्त, हिंदू बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जन्मभूमी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे राष्ट्रार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यामुळे देशभरामध्ये उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही गेल्या सात दिवसांपासून आमदार लांडगे यांनी विविध धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथून रथ यात्रेला सुरूवात झाली. हजारो दुचाकी व चारचाकी, चार विजयरथ, राम मंदिर प्रतिकृती, मर्दानी खेळ, डी.जे. ढोल पथक, झांज पथक, श्रीराम जिवंत देखावा, गंगा आरती, सनई चौघडे, महाबली हनुमान, कलश यात्रा, आतिषबाजी यासह हिंदू धर्माबाबत जागृती करण्यासाठी विविध देखावे सादर करण्यात आले.

आमदार लांडगे यांचा पायी प्रवास

निगडी ते चिखली या रथ यात्रेच्या मार्गावर हजारो दुचाकी व चारचाकी सहभागी झाल्या. तसेच, रथ यात्रेच्या दोन्ही बाजूंनी सहभागी होत नागरिक, रामभक्त सहभागी झाले. पायी चालणाऱ्या रामभक्तांसोबत आमदार महेश लांडगे यांनी निगडी ते चिखली रामायण मैदानापर्यंत पायी प्रवास केला. तसेच, कारसेवक नंदकुमार सातुर्डेकर व सहकाऱ्यांची राम रथामध्ये मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांनी दोन्ही बाजुंनी फुलांचा वर्षाव करत रथ यात्रेचे स्वागत केले. पोलिसांनी चोख बंदोबस्त आणि वाहतुकीचे अचूक नियोजन केले होते.

…हा क्षण भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल

श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिरात होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा तमाम हिंदू बांधवांच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. हिंदूत्व आणि अखंड भारताचा दुवा असलेले श्रीराम मंदिर हे यापुढील हजारो पिंढ्यांसाठी प्रेरणादायी राहणार आहे. या मंगलमय सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड अगदी राममय झाले आहे. तमाम भारतवासीयांना या ऐतिहासिक सोहळ्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. मनामनात राम असावा…घराघरांत उत्सव साजरा करावा, असे आवाहन करतो.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

राजन साळवी यांची पुन्हा एसीबीकडून चौकशी; सातव्यांदा झाले हजर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.