Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काळ आला होता मात्र वेळ आली नाही! कुत्रा समजुन चिमूरड्याने दाखवला आई वडिलांना बिबट्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 30 May 2024, 16:00
leopard with cub seen avsari khurd amebgaon pune

पुणे : अवसरी खुर्द (आंबेगाव) येथे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याची प्रचिती एका शेतमजूर दाम्पत्याला आली. दोन वर्षाच्या लहान मुलाने बिबट्याला कुत्रे समजून आई-वडिलांना भू भू (श्वान) आहे म्हणून दाखवले आणि आई-वडिलांचा बिबट्याला पाहून थरकाप उडाला. तात्काळ लहान मुलाला उचलून पळून बाजूला गेले. उन्हाळ्यामुळे सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी बाजरी काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सर्वत्र सरू आहे.

मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेनऊच्या सुमारास अवसरी खुर्द येथील कोसरपट्टी या परिसरात विकास टेमकर यांच्या शेतामध्ये दोन शेतमजूर (पती-पत्नी) बाजरीची तोडणी करत असताना त्यांच्याबरोबर त्यांचा दोन वर्षाचा लहान मुलगा देखील होता. बाजरी तोडणी करत असताना लहान मुलांनी वडिलांना सांगितले की, पाठीमागे मागे भू भू आहे. वडिलांनी मागे वळून पाहिले असता त्या ठिकाणी बिबट्याचा बछडा व मादी होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पती-पत्नी आपल्या लहान मुलाला उचलून घेऊन लांब पळाले व विकास टेमकर यांना या घटनेची माहिती दिली. टेमकर यांनी वन विभागाला ही माहिती कळवली.

तात्काळ वन विभागाचे वनरक्षक रईस मोमीन, वनरक्षक सी. एस. शिवचरण, बिबट रेस्क्यू सदस्य मनोज तळेकर, मिलिंद टेमकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या घटनास्थळाच्या ठिकाणी चारही बाजूने उसाचे क्षेत्र व मधोमध बाजरीचे क्षेत्र आहे. वनरक्षक रईस मोमीन यांनी घटनास्थळी ट्रॅप कॅमेरा लावला आहे. रईस मोमीन, सी. एस. शिवचरण यांनी या परिसरातील नागरिकांना सजग राहण्याचे आव्हान केले. या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून एकटे फिरू नये व शेती कामे करताना शक्यतो लहान मुलांना घरीच ठेवावे. घरी ठेवणे शक्य नसेल तर आपल्या नजरेसमोरच शेती कामे करताना लहान मुलांना ठेवावे व त्यांना गडद रंगाचे कपडे घालू नये, असे आवाहन नागरिकांना मोमीन यांनी केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21
Next Post

'मी आयुक्त बोलतोय, तातडीनं माझ्या या नंबरवर पैसे पाठवा...' पुणे महापालिकेत चक्क आयुक्तांच्याच नावाने झाली पैशांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp