Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रुपीनगरमधील रुपी हौसिंग सोसायटीचा ‘अंधकार संपला’; भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 5 August 2024, 19:51
MLA Mahesh Landge talks about kudalwadi encroachment

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसरात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुपीनगर येथील रुपी हौसिंग सोसायटी व परिसरात गेल्या ८ दिवसांपासून वीज नाही. मात्र, आता स्थानिक नागरिक व सोसायटीधारकांना सहन करावा लागणारा ‘अंधकार संपला’ आहे. या भागात महावितरण प्रशासनाकडून नवीन मुख्य वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे.

 

रुपीनगर येथील रुपी हौसिंग सोसायटीमध्ये मुख्य वीजवाहिनी खराब झाली होती. त्यामुळे गेल्या ८ दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन केबलला तात्पुरता जाॅईंट करण्यात आला. मात्र, वीज समस्या पुन्हा उद्भवली होती.

दरम्यान, माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांच्या पुढाकाराने स्थानिक नागरिकांनी सदर समस्या भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या कानावर घातली. आमदार लांडगे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता अतूल देवकर यांच्याशी संवाद साधला आणि नवीन वीज वाहिनी टाकण्याबाबत सूचना केली. त्याची तातडीने दखल घेण्यात आली आणि आज ३१० मीटर अंतरावरील वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले. विशेष म्हणजे, आमदार महेश लांडगे यांनी सदर काम स्वनिधीतून केले आहे.

यावेळी माजी नगरसेवक शांताराम भालेकर, कार्यकर्त्या अस्मिता भालेकर, रविंद्र काळे, गणेश मगर, शिवाजी बोडके, विशाल खाणेकर, प्रशांत हिवाळे, सुनिल समगीर, अरुण पाटील, साहेबराव मळेकर, किरण पाटील, रविराज शेतसंधी, अनिल भालेकर, रमेश भालेकर, संदीप जाधव, शिरीश उत्तेकर यांच्यासह सोसायटीमधील रहिवाशी सुमन काकडे, शीतल पारखी, केणेकर, स्वाती कासार आदी उपस्थित होते.

रहिवाशांनी मानले आमदार महेश लांडगे यांचे आभार….

दरम्यान, अतिमुसळधार पावसामुळे रुपीनगर, तळवडे परिसरातील सखल भागामध्ये पाणी साचले. आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक पातळीवर माजी नगरसेवक शांताराम भालेकर आणि सहकाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. नैसर्गिक आपत्तीच्या काळात आमदार लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे यांनी परिसरात पाहणी केली.

स्ट्रॉम वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन, रस्त्याची दुरुस्ती अशी कामे हाती घेण्यात आली. तसेच, नागरिक, गृहिणी-विद्यार्थी आणि व्यापारी-उद्योजकांना भेडसावणारी वीज समस्या निकालात काढण्यासाठी मुख्य वीजवाहिनी नवीन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि सोसायटीधारकांनी आमदार महेश लांडगे यांचे आभार मानले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गरीबांची ‘जीवनदायिनी’ आता हायटेक! मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आता ‘फुल्ल डिजिटल’, 7 एप्रिलपासून जुनी पद्धत कायमची बंद

Friday, 10 April 2026, 7:54

Pune weather: आज पुण्यात निरभ्र आकाश आणि कडक ऊन; पहा हवामान अंदाज

Friday, 10 April 2026, 7:39

Daily Horoscope: करिअरमध्ये प्रगती आणि हातात पैसा; माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आज ‘या’ राशींची चांदी होणार!

Friday, 10 April 2026, 7:31

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
Next Post

हर हर महादेव...! पहिल्या श्रावणी सोमवारी भुलेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी; शिवलिंगास आकर्षक फुलांची सजावट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.