Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अनंतराव पवार महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

राजेंद्रकुमार शेळकेby राजेंद्रकुमार शेळके
Saturday, 22 June 2024, 22:52

राजेंद्रकुमार शेळके

पिरंगुट : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘योग प्रात्यक्षिका’चे आयोजन करण्यात आले होते. २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ ही संकल्पना घेऊन हा दिवस महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी नियमितपणे योग करण्याची प्रतिज्ञा घेतली.

यावेळी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी आपल्या जीवनामध्ये योग कशाप्रकारे महत्त्वाचा आहे हे सांगितले. स्वतः बरोबरच कुटुंबासाठी योग महत्त्वाचा आहे, हे सांगताना आपल्या वैयक्तिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक, आत्मिक समाधानाची पूर्ती देखील योगसाधनेमधून होत असते.

 

योग हा विद्यार्थी, पालक, प्रौढ या सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. या दिनाचे औचित्य साधून सर्वांनी योग करणे महत्त्वाचे आहे, असे मत अभय खंडागळे यांनी मांडले. केवळ आजच्या दिवसापुरता योग न करता सातत्याने तो केला जावा यासाठी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक यांमार्फत योगाची प्रात्यक्षिके दिली जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

या योग दिनाच्या निमित्ताने प्रा. अनिल मरे यांनी ‘आरोग्यासाठी योगसाधना’ या विषयावर व्याख्यान दिले. प्रात्यक्षिकांसाठी योग सादरीकरण करून उपस्थितांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. तसेच सूर्यनमस्कार आणि मणक्याच्या व्याधीसाठी उपयोगी असणाऱ्या योगाचे प्रकार, व्यायाम प्रकारांची प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग प्रात्यक्षिक करणाऱ्यामधून उत्कृष्ट योग करणाऱ्या महिला प्राध्यापक, पुरुष प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना पारितोषिक जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले, तर आभार उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी मानले.

राजेंद्रकुमार शेळके

राजेंद्रकुमार शेळके

सन–२००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.दैनिक पुढारी,दैनिक केसरी,दैनिक पुण्यनगरी,दैनिक लोकमत आदी वर्तमान पत्रात पत्रकार म्हणून काम. अनेक दर्जेदार वृत्त पत्रांतून ललित लेख,कथा सदर, काव्य पुष्प प्रसिध्द,अनेक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त,एका कवितेची जागतिक विश्व विक्रमी काव्यसंग्रहात नोंद,पुणे आकाशवाणी तसेच सह्याद्री वाहिनी दूरदर्शनवर कवितांचे सादरीकरण प्रसिद्ध. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.कलाम साहेब यांचे अभिनंदन पत्र प्राप्त.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

आरोग्याची काळजी घ्या; आरोग्य विभागाकडून आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.