Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

HSRP Number Plate Deadline : १८ फेब्रुवारीपासून आरटीओची धडक कारवाई… तुमचा एक निष्काळजीपणा पडू शकतो महागात! रस्त्यावर गाडी काढण्यापूर्वी ‘हे’ वाचाच

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 February 2026, 16:29
HSRP Number Plate Deadline

PHOTO- SOCIAL MEDIA

HSRP Number Plate Deadline : एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) नंबर प्लेट बसवण्याबाबत वाहनधारकांसाठी दिलेली अंतिम मुदत संपल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईचा टप्पा जवळ आला आहे. ३१ डिसेंबर २०२५ ही एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी शेवटची तारीख होती. त्यानंतर ज्या वाहनधारकांनी वेळेत स्लॉट बुक केला होता, त्यांच्या वाहनांवर जानेवारी महिन्यात नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्रशासनाने त्यानंतरही १५ दिवसांची अतिरिक्त मुदत दिली असून, १५ फेब्रुवारीपर्यंत ही संधी उपलब्ध आहे. मात्र, १८ फेब्रुवारीपासून एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर थेट कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

केंद्र सरकारने एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामागे वाहन चोरी रोखणे, बनावट नंबर प्लेटचा वापर थांबवणे आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा उद्देश आहे. त्यामुळे ही नंबर प्लेट केवळ औपचारिकता नसून वाहन सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते.

जानेवारीत बहुतांश वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर एचएसआरपी प्लेट बसवली असली, तरी अजूनही मोठ्या संख्येने वाहने नियमबाह्य स्थितीत रस्त्यावर धावत आहेत. काही वाहनधारकांना फेब्रुवारी महिन्याची अपॉइंटमेंट मिळाल्याने प्रशासनाने १५ फेब्रुवारीपर्यंत थोडी शिथिलता दिली आहे. मात्र त्यानंतर कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संकेत आरटीओ विभागाकडून देण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान केवळ नंबर प्लेट तपासणीपुरतीच मर्यादा राहणार नाही. एचएसआरपी प्लेट नसलेल्या वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र, चालक परवाना, विमा आणि पीयूसी यासारखी कागदपत्रे तपासली जाणार आहेत. यापैकी काहीही अपूर्ण असल्यास वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

दरम्यान, फिटमेंट सेंटर कमी असल्याच्या तक्रारीनंतर आरटीओच्या सूचनेनुसार काही प्रमाणात फिटमेंट सेंटरची संख्या वाढवण्यात आली आहे. तरीही अनेक वाहनधारकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. डिसेंबरमध्ये पुण्यातच सुमारे ५० हजार वाहनधारकांनी एचएसआरपीसाठी नोंदणी केली होती. हा वेग पाहता सर्व वाहनांना प्लेट बसवायला आणखी काही महिने लागू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

यामुळे परिवहन विभाग पुन्हा मुदतवाढ देतो की १८ फेब्रुवारीपासून कठोर कारवाई सुरू करतो, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्या तरी नियम पाळून तात्काळ नंबर प्लेट बसवून घेणे हाच सुरक्षित आणि शहाणपणाचा पर्याय आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Khed ZP Election Result: 'Torch' blazing in Khed! Thackeray group's single-handed power in the Panchayat Samiti; 'Ubatha''s saffron in 5 out of 8 seats in the Zilla Parishad too

Khed ZP Election Result: 'खेडमध्ये 'मशाल' धगधगली! पंचायत समितीवर ठाकरे गटाची एकहाती सत्ता; जिल्हा परिषदेतही 8 पैकी 5 जागांवर 'उबाठा'चा भगवा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.