Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Haveli : श्रीरामनगरमध्ये मोटार रिपेअरिंग दुकानातून लाखोंचा कॉपर माल चोरी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 November 2025, 20:53
haveli

photo- ppn

Haveli : श्रीरामनगर (बांडेवाडी), ता. हवेली – परिसरातील मोटार रिपेअरिंग दुकानाला अज्ञात चोरट्यांनी फोडाफोड करून मोठा झटका दिला असून तब्बल ₹2,98,169 किमतीचा कॉपर साहित्य आणि इतर महत्त्वाचा माल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दुकानमालक सोपान विठ्ठल कोंडे (वय 53, रा. कुसगाव, ता. भोर) यांनी याबाबत राजगड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

 

घटनेनुसार, दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 7 वाजता दुकान लॉक करून गेले होते. दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता दुकान उघडले असता खिडकीचे लोखंडी ग्रील धारदार साधनाने कापलेले दिसले. दुकानातील रॅक, कपाट, बॅरल आणि काउंटरमधील मौल्यवान कॉपर साहित्य पूर्णपणे गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरीची घटना स्पष्ट झाली. (Haveli)

चोरट्याने खालील माल चोरून नेल्याची नोंद आहे

122 किलो कॉपर वायर —₹1,00,868

56.034 किलो कॉपर बुश — ₹49,888

36 तुकडे कॉपर बुश — ₹7,900

बॅरलमधील स्क्रॅप कॉपर वायर — ₹1,00,805

100 मीटर सबमर्सिबल वायर — ₹9,096

गणमीटर बुश — ₹8,000

SKF बेअरिंग — ₹21,612

एकूण किंमत ₹2,98,169 इतकी असल्याचे पोलिसांनी पुष्टी केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला असून चोरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. कापलेला ग्रील, आतमध्ये उचकापाचक, मालाची निवड करून चोरी, तसेच वजनदार साहित्य नेण्यासाठी वाहनाचा वापर झाल्याची शक्यता तपासात दिसत आहे. (haveli)

परिसरातील CCTV फुटेज, स्क्रॅप दुकाने, कॉपर मटेरियल खरेदी-विक्री करणाऱ्या ठिकाणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दुकानाजवळील हालचाली, संशयास्पद व्यक्ती, रात्रीच्या वेळेत झालेल्या फिरतीचा मागोवा घेण्याचे प्रयत्न पोलिसांनी वाढवले आहेत.

दाखल प्रक्रिया पोहवा 1860 कोल्हे यांनी पूर्ण केली असून सपोनि राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ देण्याचे आवाहन केले आहे.

या चोरीच्या घटनेमुळे श्रीरामनगर परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेची अतिरिक्त पावले उचलण्याची मागणी होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42
Next Post
shirur

Shirur : शिरूर तालुक्यातील केळी उत्पादकांना फक्त २ ते ४ रुपये प्रति किलो दर,शेतकरी आर्थिक अडचणीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.