Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर पोलिसांची धमाकेदार कामगिरी; १९ लाखांचा १३२ किलो गांजा जप्त

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Saturday, 28 December 2024, 18:44

दीपक खिलारे / इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शेटफळ हवेली गावच्या हद्दीत पाठलाग करत १९ लाख ९२ हजार ६१५ रुपये किंमतीचा १३२ किलो ८४१ ग्रॅम वजनाचा गांजा पकडला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक केली असून २३ लाख २२ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली.

नवनाथ राजेंद्र चव्हाण (वय ३० वर्ष, रा. शेटफळ, हवेली, ता. इंदापूर, जि. पुणे) व शिवाजी जालींदर सरवदे (वय-३० वर्ष, रा. निरा नरसिंहपुर, ता. इंदापूर, जि. पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई २६ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार गणेश डेरे यांना शेटफळ हवेली गावच्या हद्दीत दोन इसम हे एका मालवाहतूक टेम्पो मधून विक्रीसाठी गांजा घेवून येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. त्यांनी ती माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना दिली. कोकणे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत व गुन्हे शोध पथकाच्या पथकाला संपूर्ण कल्पना देवून कारवाई करण्याची सूचना दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

 

या कारवाईत आरोपींकडून १९ लाख ९२ हजार ६१५ रुपयांचा गांजा, ३ लाख रुपये किमतीचा मारूती सुझुकी कंपनीचा सुपर कॅरी मॉडेलचा नंबर नसलेला माल वाहतूक करणारा टेंपो, ३० हजार रुपयांचे दोन मोबाईल, असा एकूण २३ लाख २२ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली.

ही कामगिरी इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते, फौजदार पुंडलिक गावडे, सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, फौजदार दत्तात्रय लेंडवे हवालदार सलमान खान, अंमलदार गणेश डेरे, तुषार चव्हाण, अंकुश माने, विशाल चौधर, गजानन वानोळे यांनी केली.

दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

रक्षकच बनले भक्षक! १ कोटींवर डोळा; पुण्यात पोलिसांनीच रचला दरोड्याचा कट, चोरीचा ‘सिनेस्टाइल’ थरार….

Monday, 27 July 2026, 14:23

महिलेशी वाद घातला, पोलिसालाही धक्काबुक्की केली! पुण्यात डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल

Monday, 27 July 2026, 14:17

चासकमान कालव्याच्या कामावर शेतकऱ्यांचा आक्षेप; अस्तरीकरणाचे काम पाडले बंद

Monday, 27 July 2026, 13:48

तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; धडक मोहिमेला कोर्टाचा ब्रेक?

Monday, 27 July 2026, 13:19

क्रिकेट स्पर्धेतील गोळीबार प्रकरणात योगेश मचालेसह टोळीवर मोक्का; शिरूर पोलिसांची कारवाई

Monday, 27 July 2026, 12:38

श्री वेंकटेश मंदिर विकासकामांना सुरुवात; आणखी 2 कोटींचा निधी मंजूर

Monday, 27 July 2026, 12:12
Next Post
BJP MLA ravindra chavan appointed as prabhari in charge Maharashtra

भाजपने माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवली मोठी जबादारी; महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून केली नियुक्ती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.