Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारताला क्रीडा महासत्ता करण्याचे ध्येय- पांडूरंग चाटे; ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात ‘विश्वनाथ स्पोर्ट मिट’ स्पर्धेला प्रारंभ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 30 January 2024, 15:59

लोणी काळभोर : भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असताना ऑलिंपिकमधील पदकांची संख्या नक्कीच खटकणारी आहे. त्याचमुळे भारतातील क्रीडा संस्कृतीला सरकारच्या ‘खेलो इंडिया, फिट इंडिया, टॉप्स’ (टार्गेट ऑलिंपिक पॉडियम) यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांतून चालना देण्यात येत आहे. २०३६ मधील ऑलिंपिकच्या यजमानपदासाठी सरकार प्रयत्नशील असून, त्या माध्यमातून भारताला क्रीडा महासत्ता करण्याचे ध्येय आहे, असे मत भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे (आयआरएस) यांनी व्यक्त केले.

 

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्यातर्फे आयोजित विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम-२०२४) या वर्षातील सर्वांत मोठ्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, पद्मश्री पुरस्कारप्राप्त स्कायडायव्हर शितल महाजन, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. सुनिता कराड, प्र. कुलगुरु डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. पद्माकर फड, ऑलिंपियन बॉक्सर मनोज पिंगळे उपस्थित होते.

या वेळी बोलताना चाटे म्हणाले की, सध्या भारतात क्रीडा क्षेत्राचा गोल्डन काळ चालू आहे. पूर्वी पालक आपल्या पाल्याला ‘अभ्यासाकडे लक्ष दे’ असे दटावून सांगत असत. मात्र, आता त्याला क्रीडा क्षेत्राकडे वळण्यास सांगितले जाते. अशात एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून एवढ्या मोठ्या स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे नक्कीच त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. विद्यापीठातील क्रीडा सुविधाही जागतिक दर्जाच्या असल्याचे कौतुकही चाटे यांनी या वेळी केले.

महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी देखील या कार्यक्रमाला आभासी पद्धतीने हजेरी लावत, एमआयटी एडीटी विद्यापीठ व आयोजकांचे कौतुक केले. या राज्यस्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील, जे महाराष्ट्रासोबत देशाचेही नाव मोठे करतील, असा विश्वास मंत्री बनसोडे यांनी या वेळी व्यक्त केला.

पद्मश्री शितल महाजन या वेळी म्हणाल्या की, महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांत आपले नैपुण्य दाखविल्यानंतर खेळाडू कुठेतरी मागे पडतात. त्यामुळे हार न मानता विद्यार्थ्यांनी खेळात सातत्य दाखवायला हवे. त्यामध्ये चांगले करिअर करण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून झाला पाहिजे. तसेच त्यांनी एअरो स्पोर्टस (स्कायडायव्हींग) सारख्या साहसी खेळांकडे देखील वळावे.

प्रा. डॉ. मंगेश कराड या वेळी बोलताना म्हणाले की, भारतातील क्रीडा संस्कृती झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे ऑलिंपिक-राष्ट्रकुल-आशियायी यासारख्या जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व वाढावे व एकंदर ग्रामीण तसेच शहरी भागातील खेळाडूंना प्रतिभा दाखविण्यासाठी एक चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न विश्वनाथ स्पोर्ट मिटच्या माध्यमातून होत आहे. त्याच उद्देशाने विद्यापीठात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विश्वशांती प्रार्थना व स्पर्धेचा ध्वज फडकवल्यानंतर मॅनेट कॅडेट तर्फे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर या कार्यक्रमाचा समारोप फूटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनद्वारे करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुराज भोयार यांनी केले तर आभार प्रा. पद्माकर फड यांनी मानले.

खेळातून आत्मशांती साधता येते
खेळ ही अशी शक्ती आहे की ज्यातून केवळ शारीरिक स्वास्थच नव्हे तर आत्मशांती देखील साधता येते. खेळामुळे खिलाडुवृत्ती जागृत होते. आयुष्यात पराभव कसा पचवावा याचे बाळकडू खेळाडूंना मिळते. खेळ हे एकमेव माध्यम आहे की, ज्यामुळे जगात विश्वशांती प्रस्थापित करता येवू शकते, असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी मांडले. त्यांचे अवघे १५ मिनिटांचे भाषण ऐकताना उपस्थित मान्यवर व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘काही बोलायचंय का?’, अशोक खरातने जोडले हात अन्…; कोर्टाच्या आवारात नक्की काय घडलं?

Thursday, 2 April 2026, 13:51

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10
Next Post
Mahakavya Ramayana presentation on 31st January at gate way of india at mumbai

गीत, नृत्य, नाट्य कलाविष्कारातून ३०० पेक्षा जास्त कलाकार उलगडणार महाकाव्य रामायणातील प्रसंग, ३१ जानेवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे कार्यक्रम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.