पुणे : पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. रोहिदास अशोक जाधव ( वय ३३, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली ) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी रोहिदास ने ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलं होतं. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रोहिदास अशोक जाधव ( वय २८) हा तरुण सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली परिसरातील राहणारा आहे. शिवीगाळ आणि मारहाण झाल्यानंतर तरुणाच्या तक्रारी नंतर लोणीकंद पोलीसांनी मारहाण करणाऱ्यां विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यांना अटक करावी अशी त्याची मागणी होती.
ती मागणी पूर्ण झाली माही म्हणून २८ वर्षीय तरुणाने वाघोली पोलीस चौकी समोर स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये तो ९० टक्के भाजला असून त्याच्यावर सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज १९ फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला आहे.