आदित्य बोराटे

बनावट दारूवर महागडे लेबल लावलेली दारू वाहतूक करीत असताना दौंड मधील राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून कारवाई केली या कारवाईमध्ये नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बारामती वरून मदनवाडी या ठिकाणी एका चार चाकी गाडीमध्ये बनावट दारू आणि महागड्या दारूचे लेबल घेऊन जात असताना पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
चार आरोपींमधील एका आरोपीच्या घरात बनावट दारूच्या बॉटेलला महागड्या दारूचे लेबल लावण्यात येत होते. चार आरोपींना दौंड मधील राज्य उत्पादक शुल्क विभागाने ताब्यात घेतल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असून, यात आणखी कोणाचा समावेश आहे तसेच परराज्याशी काही संबंध आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात मोहीम तीव्र केली असून, नागरिकांना अशा बनावट दारूच्या सेवनापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.







