Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

crime news : नोटा मोजताना पोलीसही थकले! कोंढव्यात दारू विक्रेत्या महिलेच्या घरी पोलिसांची मोठी कारवाई; मशिन लावून मोजली एक कोटीची रोकड!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 26 December 2025, 14:31
crime news

photo- social media

crime news : कोंढवा भागात बेकायदा दारू विकणाऱ्या एका महिलेवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना अक्षरशः धक्काच बसला. दारूच्या धंद्याबरोबरच तिच्या घरात कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम सापडली. (crime news)

कोंढवा बुद्रुकमधील काकडे वस्ती परिसरात अमरकौर ऊर्फ मद्रीसिंग जुनी नावाची महिला बेकायदा गावठी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याआधीही तिच्यावर कारवाई झालेली आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी तिच्या घरी छापा टाकला.

या छाप्यात सुमारे साडेतीन लाख रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. सुरुवातीला थोडी रोकड मिळाली, पण पोलिसांनी घराची सखोल झडती घेतली असता बेडरूममधील कपाटात नोटांची मोठमोठी बंडले आढळून आली.

रोकड इतकी जास्त होती की पोलिसांना नोटा मोजण्याचे मशीन मागवावे लागले. रात्री उशिरापर्यंत मोजणी केल्यानंतर तब्बल एक कोटी 85 हजार 950 रुपये सापडल्याचं स्पष्ट झालं. यात 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांचा समावेश होता.

 

अमरकौर, दिलदारसिंग जुनी आणि देवाश्री जुनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एवढी मोठी रक्कम कुठून आली, याबाबत महिला समाधानकारक उत्तर देऊ शकलेली नाही. त्यामुळे या पैशांच्या स्रोतावर संशय अधिक गडद झाला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्राप्तिकर विभागालाही बोलावण्यात आलं आहे. दारूचा साठा आणि सर्व रोकड जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बेकायदा दारूविक्रीसोबतच काळ्या पैशांचे व्यवहारही उघड होण्याची शक्यता आहे. पुढे आणखी मोठी नावे समोर येऊ शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे.

कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे यांनी सांगितलं की, पंचनामा करून संपूर्ण रोकड ताब्यात घेण्यात आली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

थोडक्यात, साध्या दारू विक्रीच्या कारवाईत पोलिसांच्या हाती कोट्यवधींचं घबाड लागलं आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

९१ विद्यार्थ्यांसह रस्त्यावरच भरवावा लागला वर्ग; चांडोहच्या जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीचे कुलूप!

Monday, 31 August 2026, 16:38

CJPच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; केंद्र-दिल्ली पोलिसांना नोटीस, मोर्च्यावर मात्र बंदी नाही

Monday, 31 August 2026, 16:26

भोंदू खरातला जामीन की तुरुंगवास ? जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, आता नजर पुढच्या तारखेकडे!

Monday, 31 August 2026, 16:04

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उद्या पुण्यात मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार कर्मचारी

Monday, 31 August 2026, 15:55

पुण्यात प्रेमाचा धक्कादायक शेवट! कॉम्प्युटर इंजिनीअर तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; प्रियकराला अटक

Monday, 31 August 2026, 15:53

शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो दिसला अन् अमित ठाकरे संतापले; “काढ रे तो फोटो!” म्हणत थेट खाली उतरवला

Monday, 31 August 2026, 15:37
Next Post
Pune Politics: 'Thackeray brand' explodes in Pune! 'Master plan' for seat sharing decided, will BJP's stronghold be hit by a bomb?

Pune Politics: पुण्यात 'ठाकरे ब्रँड'चा धमाका! जागावाटपाचा 'मास्टर प्लॅन' ठरला, भाजपच्या बालेकिल्ल्याला बसणार सुरुंग?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp