राहुलकुमार अवचट
यवत : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा सुरू होती. यावेळी बोलताना ही मागणी आ. कुल यांनी केली.
यावेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, राज्यात उसाची व शेतीची चांगली परिस्थिती असताना मात्र कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.
दरम्यान, उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला असुन याबाबत राज्य व केंद्र सरकारने एकत्रित येत निर्णय घेतल्यास तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणार आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास आमदार कुल यांनी बोलताना व्यक्त केला.