Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामती वाहतूक पोलिसांनी घातला थेट मुळावरच घाव; फटाका सायलेंसर विक्री करणाऱ्या दुकानांमधूनच 16 तर चालकांकडून 11 सायलेन्सर जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 19 March 2025, 18:03

बारामती, ता. 19 : बारामती वाहतूक पोलिसांनी आता फटाका बुलेटवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. असे असतानाच आता वाहतूक शाखेने फटाका सायलेंसर विक्री करणाऱ्या दुकानांवरच कारवाई करत तब्बल 16 फटाका सायलेंसर ताब्यात घेत थेट मुळावरच घाव घातला आहे. त्यामुळे सायलेंसर विक्री करणाऱ्या दुकान चालकांचे धाबे दणाणले आहेत.

बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मागील अनेक महिन्यांपासून वाहतूक नियमांची अंमलबजावणी करून अनेक कारवाया केल्या आहेत. या कारवायांमध्ये लाखो रुपयांचा दंड वाहन चालक व मालकांकडून वसुल केला आहे. बारामती वाहतूक पोलिसांनी महिनाभरापासून मोठ्या आवाजाच्या सायलेंसरवर कारवाईचा धडाका लावला आहे. पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली 12 बुलेटच्या फटाका सायलेंसरवर कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही काही विक्रेत्यांनी मोठ्या आवाजाच्या सायलेंसरची विक्री सुरूच ठेवली होती.

दरम्यान, काही दुकानांमधून बुलेट चालक हे फटाका सायलेंसर बसवून घेतात अशी माहिती पोलीस निरीक्षक यादव यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकासह बारामती शहरातील मोठ्या आवाजाचे सायलेन्सर विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तपासणी केली. या तपासणीत तब्बल  16  सायलेंसर जप्त करण्यात आले. त्यामध्ये बाइकर्स स्पेअर पार्ट ऑटोमोबाईल्स, महालक्ष्मी ऑटोमोबाईल्स, महावीर ऑटोमोबाईल्स या तीन दुकानांमध्ये मोठ्या आवाजाचे सायलेन्सर मिळून आले. बुलेट फटाका सायलेंसरवर कारवाईची मोहीम सुरू केल्यापासून आजतागायत ऐकून 51 सायलेंसर जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे, प्रदीप काळे, अजिंक्य कदम, प्रज्योत चव्हाण, सीमा घुले, स्वाती काजळे, रेशमा काळे, रूपाली जमदाडे, माया निगडे, सीमा साबळे यांच्या पथकाने केली आहे.

 

 एकाच दिवसात 11 मोठ्या सायलेंसरवर कारवाई

फटाका सायलेंसरवर कारवाई करण्याची मोहीम सुरु असताना मंगळवारी (ता.18) एका दिवसात कसबा, भिगवण चौक, नेवसे रोड, इंदापूर चौक परिसरात 11 बुलेट चालकांकडून मोठ्या आवाजाचे सायलेंसर जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बुलेट गाड्या वापरणाऱ्या चालकांना आता सायलेंट सायलेंसर वापरावे लागणार आहेत.

बारामती शहरात वाहतुकीच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. शांतता सुव्यवस्था पाळण्यासाठी ही कारवाई यापुढे अशीच अविरत सुरू राहणार आहे. असे फटाका सायलेंसर विक्री करणाऱ्या दुकानदारांना सूचना केल्या असून यापुढे विक्री सुरू ठेवल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी 9923630652 या क्रमांकावर माहिती द्यावी.

  -चंद्रशेखर यादव (पोलीस निरीक्षक – बारामती वाहतूक शाखा)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी सुनावणी! खरातच्या ‘त्या’ व्हिडिओंबाबत कोर्टाचा महत्वाचा आदेश; ‘व्हिडीओ वकिलांना दाखवा पण…’

Wednesday, 30 September 2026, 20:26

दुबईहून तेल अवीव जाणाऱ्या विमानात हायजॅकचा थरार! ९/११ सारख्या हल्ल्याचा कट? कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूहल्ला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 30 September 2026, 19:57

पृथ्वीराज कपूर हायस्कूल तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Wednesday, 30 September 2026, 19:34

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 30 September 2026, 19:28

यवतमध्ये भरदिवसा महिलांची चैन स्नॅचिंग; बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिक आक्रमक; सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Wednesday, 30 September 2026, 19:10
Next Post

जिच्या वाढदिवसासाठी आला तिनेच केले त्याचे 15 तुकडे, प्लास्टिकच्या ड्रममध्ये मृतदेह लपवून गेली सहलीला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp