Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लेक लाडकी योजनेचा लाभ घ्या अन् लखपती व्हा; आता पोस्ट ऑफिस बचत बँक खात्याद्वारे लाभ घेता येणार…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 March 2024, 14:33

पुणे : महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्रात १ एप्रिल २०२३ पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत १ लाख १ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे डाकघर ग्रामीण विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली.

 

या योजनेच्या माध्यमातून राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे तसेच बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लाभार्थी मातांनी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन संयुक्त बचत खाते उघडून लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही एरंडे यांनी केले आहे.

‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, अकरावीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे. शासनामार्फ़त थेट लाभार्थी हस्तांतरणद्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याचप्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

योजनेचा लाभ पोस्ट ऑफिसमध्ये घेता येणार
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन लाभार्थी बालिका व तिची आई यांच्या नावाने संयुक्त बचत खाते उघडणे अनिवार्य आहे. याबाबतचा तपशील कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन प्राप्त करता येऊ शकतो.

‘या’ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे कराल अर्ज?
तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे. या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, पोस्ट ऑफिस बचत बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे. अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.) लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहिल.), पालकाचे आधार कार्ड पोस्ट ऑफिस बचत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत) ,मतदान ओळखपत्र, शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे. त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. त्यानंतर सदर अर्ज अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post

पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांचा प्राधिकरण परताव्याचा 'जीआर' अखेर निघाला; कॅबिनेट मिटिंगमध्ये निर्णय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.