Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सूचनेनंतर जलसंपदा अधिकाऱ्यांकडून पाण्याची गळती थांबविण्याची कार्यवाही सुरू..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 17 December 2022, 19:50

दीपक खिलारे

इंदापूर : इंदापूर तालुक्यात निरा नदीवरील बोराटवाडी, खोरोची, पिठेवाडीसह इतर बंधाऱ्यांमधून पाण्याची होत असलेली गळती थांबवण्याचे काम तात्काळ सुरू करावे, अशी सूचना भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शनिवारी (दि.१७) केली. त्यानुसार बोराटवाडी, खोरोची आदी बंधाऱ्यांस जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आजच (शनिवारी) भेट देऊन, पाण्याची गळती बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

नीरा नदीवरील बंधार्‍यांमधून होणारी पाण्याची गळती बंद करणेसंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी जलसंपदाचे पुणे पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, बारामती विभागाचे उपअभियंता अश्विन पवार, शाखा अभियंता झगडे, के. एस. सावंत यांचेशी तात्काळ कार्यवाही सुरु करण्यासाठी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानुसार शाखा अभियंता झगडे, सावंत यांनी बोराटवाडी, खोरोची बंधाऱ्याची पाहणी करून उद्यापासून गळती थांबविण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे शेतकऱ्यांशी बोलताना नमूद केले.

निरा भिमा कारखान्याचे माजी संचालक आदिनाथ पाटील, दूधगंगा संघाचे संचालक दयानंद गायकवाड, शहाजी पाटील, कांतीलाल नरुटे, संतोष फडतरे, दत्तू फडतरे यांच्यासह बोराटवाडी, खोरोची येथील शेतकऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क करून बोराटवाडी, खोरोची, पिठेवाडी येथील बंधाऱ्यांची गळती होत असल्याने, हे बंधारे पाण्याअभावी लवकर कोरडे पडून शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी तात्काळ जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून नीरा नदीवरील सर्व बंधाऱ्यांची गळती बंद करणेसाठी मोहीम हाती घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार जलसंपदा खाते तातडीने गळती बंद करण्यासाठी कामाला लागले आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कॉलेजला गेली अन् घरी परतलीच नाही; लोणी काळभोर येथील पोलीस कर्मचाऱ्याची 22 वर्षीय तरुणी बेपत्ता

Saturday, 3 October 2026, 16:31

मांजरीत गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 3 October 2026, 16:07

चार जिवलग मित्रांवर एकत्रित अंत्यसंस्कार; ”‘देवा आमच्यावर हा अन्याय का केलास” म्हणत माऊलींचा आक्रोश; कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

Saturday, 3 October 2026, 16:00

न सांगता घर सोडलं, ४ दिवसांपासून बेपत्ता, एक चिठ्ठी अन् लॉजवर गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

Saturday, 3 October 2026, 15:52

सोमेश्वर निवडणुकीत मोठा ट्विस्ट!अजित पवारांच्या नाव-फोटोवर बंदी, जगतापांना आयोगाचा दणका,फ्लेक्स-बॅनर्स हटवण्याचे आदेश

Saturday, 3 October 2026, 15:36

“मी पण गे आहे, आपण भेटायचं का?” म्हणत तरुणाला बोलावलं अन् पुण्यात पडक्या खोलीत नेल्यानंतर २२ वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 3 October 2026, 15:28
Next Post

धक्कादायक : मतदान साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या शिक्षकाचा टेम्पोच्या धडकेत जागेवरच मृत्यू ; वेल्हे तालुक्यातील घटना..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp