Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 सासवड येथे चिमुकल्यांना सापडलेली 5 तोळे सोन्याची माळ प्रामाणिकपणे केली परत!  

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 31 March 2025, 19:16

बापू मुळीक

 

सासवड: सासवड परिसरातील प्राचीन कुंजीरवाड्याजवळ हरवलेली पाच तोळे वजनाची सोन्याची माळ दोन चिमूकल्यांना सापडली असता सासवड पोलिसांकडे सुपूर्द केली. त्यानंतर पोलिसांनी खात्री पटवून मूळ मालकाला ही साडेचार लाख रुपयांची सोन्याची माळ परत केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सासवड परिसरातील प्राचीन कुंजीरवाड्याजवळ सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक जितेंद्र उर्फ (सोनू काका) जगताप यांचे घर आहे. सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे, त्यांच्या घरातील, वरून प्रदीप जगताप (वय 9) व शर्व राज महेंद्र जगताप ( वय 8 ) ही दोन चिमुकली मुले दुपारी घराबाहेर खेळत होती. खेळताना या मुलांना पिवळी चमकणारी माळ सापडली. कुतूहलाने त्यांनी ती माळ घेऊन घर गाठलेे. घरात आल्यावर त्यांनी जितेंद्र जगताप यांना आम्हाला ही माळ सापडल्याचे सांगितले. यावेळी ही माळ सोन्याची असावी असे त्यांना वाटले.

त्यानंतर खात्री करून त्यांनी त्वरित दोन्ही मुलांना घेऊन सासवड पोलीस स्टेशन गाठले. सोन्याची माळ पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द केली. सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी आपण हा सोन्याचा दागिना सापडल्याचे, सर्वत्र प्रसारित करून मालकांचा शोध घेऊ असे सांगितले.

मात्र, तोपर्यंत मेघा रमेश गायकवाड (रा. कात्रज पुणे) या कुंजीरवाड्याजवळ रस्त्यावर दागिना शोधण्यासाठी हिंडताना त्यांच्या कुटुंबीयांना दिसल्या. त्यानंतर त्यांना सासवड पोलीस ठाण्यात दागिना जमा केल्याची माहिती मिळाली. पोलीस ठाण्यात आल्यावर पोलिसांनी बिलाचा फोटो व सर्व खात्री केल्यावर सोन्याची माळ मेघा गायकवाड यांना परत केली.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
four people attacks on youth in hadapsar Pune

शिक्षकी पेशाला काळिमा; लातूरच्या तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.