Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमदार राहुल कुल यांच्यामुळे तब्बल ८ वर्षांनंतर जनाई उपसा सिंचन योजनेचे पाणी रोटीत पोहचले ; अखेर तरुणांच्या प्रयत्नांना यश…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 26 July 2022, 13:03

पुणे : दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी भागातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या उद्दिष्टाने कोट्यवधी रुपये खर्च करून पुरंदर उपसा सिंचन व जनाई-शिरसाई सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु, ही योजना सुरू होऊनसुद्धा दौंडच्या दक्षिणेकडील भागातील अनेक गावे अद्यापही पाण्यापासून वंचित आहे. वर्षानुवर्षे शासनाची उदासीनपणा व नियोजना अभावी योजना हि कुचकामी ठरत आहे. हे तितकेच खरे असले तरी तरुणांनी मनावर घेतले. आणि लोकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास कुठलाही प्रश्न मार्गी लागू शकतो. याचे उदाहरण (रोटी, ता. दौंड) येथील माझ्या युवा सहकाऱ्यांनी दाखवून दिले आहे.

जनाई उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेवटचे गाव असलेल्या रोटी (ता. दौंड) या गावास योजना कार्यान्वित झाल्यापासून शेवटचे आवर्तन खरीप २०१३-१४ मध्ये मिळाले होते. वितरण कुंड ते जनाई डावा कालवा अंतर सा. क्र. ६३०० मी व तेथून पुढे हिंगणी गाड़ा शाखा कालवा द्वारे रोटी गांव हे अंतर ८४२० मी. इतके आहे. व त्यापुढे ओढ्या द्वारे अंतर १५०० मी कापल्या नंतर रोटी गावातील नाले व बंधारे भरता येतात. वितरण कुंड ते रोटी गावातील बंधारे हे एकूण अंतर १६.२२० मी. असून सा. क्र. ६३०० च्या पुढे रोटी कडे जाणारा हिंगणी गाड़ा शाखा कालवा नादुरुस्त असल्याने व वहन अंतर जास्त असल्याने पाणी पोहोचत नव्हते. व त्यामुळे गेले अनेक वर्षे रोटी सदर सिंचन योजनेच्या लाभा पासून वंचित होते.

रोटी गावास जनाई शिरसाई उपसा सिंचन योजेनचे पाणी मिळावे यासाठी गावातील तरुणांनी एकत्र येत लोकसहभागातून या कालव्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला व याकामी सहकार्याची मागणी आमदार राहुलदादा कुल यांचेकडे केली व त्यानुसार पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांच्याकडे पाठपुरावा करून उपविभागीय अभियंता, जनाई शिरसाई उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग दौंड यांच्याशी मे महिन्यामध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये हिंगणी गाड़ा शाखा कालवा दुरुस्त करण्यासाठी जलसंपदा विभागाद्वारे आवश्यक यंत्रणा व तांत्रिक सहकार्य करावे असे निर्देश आमदार राहुलदादा कुल यांनी दिले. व तद्नुसार दिनांक १५/०५/२०२२ रोजी जलसंपदा विभागाद्वारे पोकलेन मशीन उपलब्ध करून कालवा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.

दरम्यान, सुमारे ९ किमी लांबीच्या या कॅनॉलचे ३ महिने परिश्रम करून खोलीकरण व दुरुस्ती करण्यात आली हे काम सुरु असताना रोटी गावातील तरुण सहकाऱ्यांनी जातीने लक्ष देत, श्रमदान करत मोठा हातभार लावला व दिनांक १८/०७/२०२२ रोजी कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन रोटी गावास पाणी देण्यात आले.

रोटी गावातील नाला व जगताप वस्ती बंधारा भरला असून लिमकिट बंधाऱ्यामध्ये मध्ये पाणी चालू आहे व मळई बंधारा, खुरदाड नाला के ०१ व ०२ रोटी गाव बंधारा भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरुणांच्या पुढाकाराने लोकसहभागातून रोटी गावाचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न अखेर सुटला आहे. यासाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या सर्व युवा सहकाऱ्यांचे परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मारहाणीचा कळस! सूर्यफूल तेल, अंतर्वस्त्र अन् अमानुष छळ; राम पूर्णेकरांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप

Friday, 30 October 2026, 15:33

शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद पेटला, टीकेनंतर संजय गायकवाडांची माघार! एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर नेमकं काय म्हणाले?

Friday, 30 October 2026, 15:17

रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठा धक्का! रात्री ११ ते पहाटे ५ वाजेदरम्यान रेल्वेत ‘ही’ सुविधा असणार पूर्णपणे बंद

Friday, 30 October 2026, 15:00

पत्नी चार घरची धुणीभांडी करायची, पतीच्या मनात संशयाचं भूत! थेट कोयत्याने हल्ला अन् घडली जन्माची अद्दल..;पुण्यात घडलं भयंकर

Friday, 30 October 2026, 14:56

PM किसानचा हप्ता आला! शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा,एका क्लिकवर तपासा नाव

Friday, 30 October 2026, 14:35

पुणेकरांनो पाण्याचा वापर जपून करा! पालिकेकडून १० हजार दंड आणि गुन्ह्याची तरतूद

Friday, 30 October 2026, 14:19
Next Post

Breaking News : दौंड येथे BSNL दूरध्वनी कार्यालयाच्या सुरक्षारक्षकाचा चोरट्यांकडून खून...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp