Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीकरातून अखेर मुक्ती;भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा : शिंदे-फडणवीस सरकारचे शहरवासीयांना ’’विंटर गिफ्ट’’…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 21 December 2022, 13:46

पिंपरी : गेल्या १४ वर्षापासून पिंपरी-चिंचवडकरांवर लादलेले शास्तीकराचे ओझे अखेर कमी झाले असून, राज्य सरकारने शास्तीकर माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे.

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी आज लक्षवेधी लावली. त्यावर चर्चा करताना पिंपरी-चिंचवडकरांची बाजू सक्षमपणे सभागृहात मांडली. अखेर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत पिंपरी-चिंचवडसाठी शास्तीकर माफ करण्याची घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २६७ ‘अ’ नुसार दि. ४ जानेवारी २००८ रोजीचे व त्यानंतरचे अवैध बांधकामांना देय मालमत्ताकराच्या दुपटीइतकी अवैध बांधकामांना शास्ती लावण्यात आली होती. तथापि, शासन निर्णय दि. ८ मार्च २०१९ नुसार निवासी मालमत्तांना १ हजार चौरस फुटापर्यंत शास्ती माफ करण्यात आली. एक हजार ते २ हजार चौरस फुटापर्यंत निवासी बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या ५० टक्के दराने शास्ती आकारण्यात येत होती. तसेच, २ हजार चौरस फुटांपुढील निवासी बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्ती आकारण्यात येत आहे. उर्वरित बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक मालमत्तांना दुप्पट दराने शास्ती लावली जात होती. त्यामुळे शास्तीकर अन्यायकारकपणे आकारण्याला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी विरोध केला होता.

 

दरम्यान, या ऐतिहासिक निर्णयामुळे अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाच्या लढ्याला बळ मिळाले असून, शिंदे-फडणवीस सरकारकडून पिंपरी-चिंचवडकरांच्या मागण्यांची पूर्तता होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 शहरातील ९६ हजार ७७७ मिळकतींना दिलासा…
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण ९६ हजार ७७७ बांधकामांना शास्तीकर माफीचा दिलासा मिळणार आहे. यामध्ये राहणारे सुमारे ४ लाख ५० हजार नागरिक आणि व्यापारी, व्यावसायिक यांच्यासह लघु उद्योजकांना शास्तीकरातून सुटका झाली असून, राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. सध्यपरिस्थितीत अवैध बांधकामांचा शास्तीकर ४६७.६५ कोटी रुपये आहे. चालू वर्षाचा कर ३४६.८१ कोटी रुपये अशी एकूण ८१४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी सुमारे ४५० कोटी रुपये मूळ कर वसुलीचा मार्ग मोकळा झाला असून, प्रतिवर्षी सुमारे १२० कोटी रुपये मिळकतकर वसुली सुलभ होणार आहे.

याबाबत बोलताना शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे म्हणाले की, राज्य सरकारने पिंपरी-चिंचवडकरांची भूमिका समजून घेतली. शहरातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी लावून धरली होती. आज झालेल्या लक्षवेधीमध्ये मला शहरवासीयांची बाजू मांडता आली आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकरातून आमची मुक्तता करीत आहोत, अशी घोषणा केली. याबद्दल पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने आभार व्यक्त करतो.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

पुण्यात काजूकतली फुकट दिली नाही, म्हणून दोन तरुणांचा गोळीबार करण्याचा प्रयत्न दोन वेळा झाले 'मिस-फायर' ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.