Big News : भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नितीन नबिन यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. पक्षातील सर्व घटकांमध्ये एकमत झाल्याने ही निवड निर्विवाद ठरली असून, कोणताही विरोधी उमेदवार न उभा राहिल्याने नबिन यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला.

निवडीच्या वेळी मुख्यमंत्री, पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी नितीन नबिन यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि पक्षवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच नबिन यांची निवड झाल्याचे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले.








