Anagar Nagar Panchayat : अनगर नगरपंचायत निवडणुकीत मोठा फेरफार झाला आहे. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला असून या निर्णयानंतर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. Anagar Nagar Panchayat

उज्वला थिटेंचा राजन पाटलांवर गंभीर आरोप
अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी थिटेंच्या अर्जावर सूचकाची सही नसल्याचा आक्षेप घेतला होता. हा आक्षेप मान्य करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज बाद केला. मात्र, हा निर्णय राजकीय दबावाखाली घेण्यात आल्याचा गंभीर आरोप उज्वला थिटेंनी केला आहे.
अर्ज भरताना माझा मुलगा सूचक म्हणून माझ्यासोबत होता, त्याची सही कशी काय राहू शकते? सर्व कागदपत्रांची तपासणी वकिलाकडून करण्यात आली होती. तरीही अर्ज बाद करण्यात आला, हे पूर्णपणे संशयास्पद आहे. त्या पुढे म्हणाल्या, राजन पाटील यांची पद्धत सर्वांना माहिती आहे. त्यांच्या विरोधात कोणी उभं राहिलं की त्याला भविष्यात संधी मिळू नये, हा त्यांचा प्रयत्न असतो. मतदारयादीतून नाव काढण्यापासून घर जाळण्यापर्यंत विविध घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत माझ्या अर्जातून कागद बाद करायला कितीसा वेळ लागतो?
“छाननीवेळी अनगरमध्ये दहशतीचे वातावरण”
छाननीच्या दिवशी आमचा वकील दहशतीमुळे उपस्थित राहू शकला नाही. निवडणूक अधिकाऱ्यांना याची पूर्वकल्पना दिली होती. तरीही आमच्या अनुपस्थितीत घेतलेल्या छाननीचा फायदा घेत अर्ज बाद करण्यात आला. गेल्या अडीच वर्षांपासून पाटील परिवाराविरुद्ध आपला संघर्ष सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं त्या पुढे म्हणाल्या की, मुलाच्या दाखल्याच्या प्रकरणावर केस बालहक्क आयोगात आहे. पुरावे मिटवल्याची तक्रार मानवाधिकार आयोगात चालू आहे. या सर्वांच्या दरम्यान आता अर्ज बाद करून नवीन अडथळा निर्माण केला आहे. पण मी सत्याच्या मार्गानेच हा लढा लढणार आहे.
थिटेंनी या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे. अनगरमध्ये या घडामोडींमुळे निवडणुकीत हे राजकीय वातावरण अधिकच आपल्याच दिसून येत आहे.







