उत्तर प्रदेश : पती गंगास्नान करण्यासाठी गेलेला असताना पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पतीने पोलिसात धाव घेत आपली पत्नी पळाली नसल्याचं सांगत तिला पळवून नेले आहे. अशी तक्रार दिली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊया…

ही घटना उत्तर प्रदेशातल्या कानपूरमधून मधली आहे. येथील एक विवाहित महिला घरातील सर्व सामान घेऊन शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत पळून गेली. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, महिलेचा पती गंगास्नानासाठी गेला होता. या संधीचा फायदा घेत महिलेने घरातील 15 लाख रुपये रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली आहे.
पती जेव्हा घरी आला तेव्हा त्याला आपलं घर रिकामं दिसलं. त्याने शेजारी चौकशी केली असता. त्याला सर्व प्रकार समजला. यानंतर पीडित पती पोलिसात गेला आणि आपल्या पत्नीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार केली. आपली पत्नी पळाली नसून तिला शेजारच्या तरुणाने फूस लावून नेल्याने त्याने पोलिसांना सांगितले. तसेच आपल्या जीवाला तरुणाच्या कुटुंबीयांकडून धोका असल्याचेही त्याने सांगितले आहे.
पत्नी एकटी नसून आमचा मुलगाही त्यांच्या सोबत आहे. पीडित पतीच्या तक्रारींवरून पोलिसांनी पत्नीचा आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरु केला असून, दोघे समोर आल्यानंतरचं सत्य काय आहे हे समोर येईल.






