Kerala Election : केरळ: केरळ विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध संस्थांकडून मतमतांतरे समोर येत आहेत.

या सर्वेक्षणानुसार सत्ताधारी LDF आणि विरोधी UDF यांच्यात जवळपास समान मतांचे प्रमाण दिसत आहे. UDF ला सुमारे 36.6 टक्के, तर LDF ला 36.5 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. मात्र जागांच्या बाबतीत LDF आघाडीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. LDF ला 68 ते 74 जागा मिळू शकतात, तर UDF ला 64 ते 70 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपच्या NDA ला सुमारे 14.9 टक्के मते मिळून 1 ते 3 जागा मिळू शकतात.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पिनाराई विजयन आणि वी.डी. सतीशन यांच्यात थेट स्पर्धा दिसत आहे. विजयन यांना 29.2 टक्के तर सतीशन यांना 29 टक्के लोकांचा पाठिंबा असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. काही मतदारांमध्ये भाजपचे राजीव चंद्रशेखर यांनाही पसंती मिळत असल्याचे समोर आले आहे.
महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे ठरत आहेत. तसेच काही मतदार अजूनही ठाम निर्णय घेतलेला नसल्याने निकालावर त्यांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळमध्ये यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.







