Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केंद्र सरकारची आता सहकार टॅक्सी ओला, उबरला आणखी स्पर्धा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 March 2025, 16:04
govt-to-launch-sahkar-taxi-against-ola-uber-amid-backlash-from-drivers-over-pricing-tricks

नवी दिल्ली: ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या टॅक्सी सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांप्रमाणे केंद्र सरकारने संसदेत सहकारवर आधारित नवीन ‘सहकार टॅक्सी’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली. या सेवेमुळे थेट चालकांना लाभ होईल, असा सरकारचा दावा आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी संसदेत ‘सहकार टॅक्सी’ सेवा सुरू करण्याबाबत घोषणा केली. या सेवेअंतर्गत देशभरात दुचाकी, ऑटो-रिक्षा आणि चारचाकी वाहनांची टॅक्सी म्हणून नोंदणी केली जाईल, अशी माहिती शाह यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘सहकाराकडून समृद्धी’ ही फक्त एक घोषणा नाही, तर ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार मंत्रालय गत साडेतीन वर्षांपासून अहोरात्र काम करत आहे. त्यानुसार टॅक्सी सेवा लवकरच सुरू केली जाईल.

खासगी कंपन्यांच्या उलट सरकार पुरस्कृत या टॅक्सी सेवेमुळे सर्व कमाई चालकांच्या खिशात राहील. या सेवेतून होणारा लाभ एखाद्या मोठ्या उद्योगपतीला मिळणार नाही, तर वाहन चालकांना मिळेल, असे शाह यांनी म्हटले. उल्लेखनीय बाब म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ‘यात्री साथी’ नावाने अगोदरच अशा प्रकाराची एक टॅक्सी सेवा सुरू आहे. सुरुवातीला कोलकातापुरती मर्यादित असलेली ही सेवा आता सिलीगुडी, आसनसोल आणि दुर्गापूरसारख्या शहरांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तत्काळ बुकिंग, स्थानिक भाषेत माहिती, किफायतशीर भाडे आणि २४ तास ग्राहक सेवेमुळे पश्चिम बंगालमध्ये ही सेवा प्रवाशांमध्ये चांगलीच लोकप्रिय बनली आहे. तर वर्ष २०२२ मध्ये सरकारी ऑनलाईन टॅक्सी सेवा ‘केरळ सवारी’ सुरू करणारे केरळ देशातील पहिले राज्य होते. पण उपयोग कमी असल्याने ही सेवा नंतर बंद करण्यात आली. परंतु, केरळ सरकार आता पुन्हा माफक भाडे आणि चांगल्या सॉफ्टवेअरसोबत ही सेवा पुन्हा सुरू करण्याची योजना बनवत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06
Next Post

मंचर: पत्नीवर पाणी शिंपडल्याच्या वादातून मोठ्या भावाने केली धाकट्या भावाची हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.