दिल्ली: दिल्लीच्या छावला परिसरात (Crime News) एका धक्कादायक घटनेत, एका (Delhi News) व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची मद्यधुंद अवस्थेत हत्या केली. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर मृतदेह कारमध्ये ठेवून लपवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीला झोप लागली आणि तो मृतदेह तसाच गाडीत विसरून गेला. पोलिसांनी गुरुवारी आरोपीला अटक केली आहे. (Breaking News)

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव राधा (वय 44) असून आरोपीचे नाव विरेंद्र सिंह आहे. मंगळवारी रात्री दोघेही एकत्र दारू पित होते. त्यावेळी पैशांवरून वाद झाला. या भांडणात विरेंद्रने राधाचा गळा दाबून तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. महिलेच्या चेहऱ्यावर ओरखडे आणि जखमा दिसत असल्याचे डीसीपी अंकित सिंह यांनी सांगितले.
हत्या केल्यानंतर विरेंद्रने आपल्या दोन मित्रांना बोलावले आणि मृतदेह कारमध्ये ठेवण्यासाठी त्यांची मदत घेतली. मृतदेह कारच्या मागील सीटवर ठेवून तो लपवण्यासाठी निघणार होता, पण मद्यधुंद अवस्थेमुळे तो परत खोलीत जाऊन झोपला.
बुधवारी सकाळी सुमारे 9.15 वाजता एका शेजाऱ्याने कारच्या मागच्या सीटवर मृतदेह पडलेला पाहिला आणि तात्काळ पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. तपासात समोर आले की विरेंद्र विवाहित असून त्याला मुले आहेत. तरीही तो गेल्या दोन वर्षांपासून राधासोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होता. राधाच्या पतीचा काही वर्षांपूर्वी कॅन्सरने मृत्यू झाला होता, तसेच तिच्या वडिलांचेही निधन झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरेंद्रने राधाला पालममधील तिचे घर विकायला लावले होते. त्या पैशातून त्यांनी सध्या राहत असलेले तीन मजली घर विकत घेतले. विक्रीनंतर उरलेले 21 लाख रुपये रोख त्यांच्याकडे होते आणि या पैशांवरून दोघांत सतत वाद होत असत. या वादातूनच हत्या घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी विरेंद्रला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.







