सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याने अनेकांचे डोळे पाणावले आहेत. हा व्हिडिओ अनेकांच्या मनाला स्पर्श करत असून, त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. एका मित्राने आपल्या मित्राला अंत्ययात्रेत नाचून अनोख्या पद्धतीने निरोप दिला आहे. ज्यामुळे हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

ही घटना मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील जवासिया गावातील आहे. येथील रहिवासी सोहनलाल जैन यांचे 29 जुलै 2025 रोजी निधन झाले. यापूर्वी 2021 मध्ये सोहनलाल यांनी आपल्या दोन मित्रांना एक हृदयस्पर्शी पत्र लिहून, अंबालाल प्रजापती आणि शंकरलाल पाटीदार यांना एक खास विनंती केली होती. या पत्रात त्यांनी लिहिले होते की, ‘त्यांच्या निधनानंतर कोणीही रडू नये, उलट त्यांच्या अंत्ययात्रेत नाचत त्यांना आनंदाने निरोप द्यावा. सोहनलाल यांनी या पत्रात आपल्या मित्रांकडे माफी मागत, जर काही चूक झाली असेल तर क्षमा करावी, असंही लिहिले होते.
अंतिम यात्रा में डांस करना कह कर गए थे सोहनलाल जैन
मन्दसौर :- जवासिया ग्राम में एक दोस्त ने दोस्त से किया वादा पूरा किया, उसकी अंतिम यात्रा में डांस करना कह कर गए थे सोहनलाल जैन, आज अंबालाल प्रजापत ने अपने दोस्त की शव यात्रा के सामने किया डांस। pic.twitter.com/Ki7IBUjnKJ
— 🇮🇳Jitendra pratap singh🇮🇳 (@jpsin1) July 31, 2025
सोहनलाल यांच्या या भावनिक इच्छेचा आदर करत, 30 जुलै 2025 रोजी त्यांच्या अंत्ययात्रेत त्यांचा मित्र अंबालाल प्रजापती याने त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली. अंबालाल यांनी अंत्ययात्रेच्या पुढे नाचत आपल्या मित्राला निरोप दिला. हा अनोखा आणि भावनिक क्षण पाहून तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी भरले.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यातून मैत्रीचे एक हृदयस्पर्शी उदाहरण समोर आले आहे. सोहनलाल यांच्या पत्राने आणि अंबालाल यांच्या कृतीने मैत्रीच्या बंधनाची खरी ताकद सर्वांना दिसून आली.







