Wednesday, February 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manoj Jarange Patil: “माझ्या नादाला लागू नका, तुमची लफडी माझ्याकडं आहेत!” जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; संतोष देशमुखांचं नाव घेत म्हणाले “रक्ताने माखलेल्या…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 February 2026, 22:58

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील वाद आता नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत थेट इशाराच दिला. (Maharashtra Politics)

प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्या माझ्याकडे 22 पेक्षा जास्त प्रकरणांची माहिती आली आहे. त्यामुळे इथून पुढे माझ्या नादाला लागू नका. मी अजून त्या प्रकरणांत हात घातलेला नाही, पण गरज पडली तर सर्व उघड करेन.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जरांगे यांनी पुढे आरोप करत म्हटले की, “घातपाताच्या सुपाऱ्या देऊन आमचेच लोक उचकवले जात आहेत. आम्ही संपूर्ण माहिती घेत आहोत. तुमची लाभार्थी टोळी माझ्याविरोधात कशी लावली गेली, हे मला ठाऊक आहे. अजूनही वेळ आहे, सावध व्हा.” त्यांनी नागपूरमधील एका महिलेचा उल्लेख करत, तिच्याकडून गंभीर माहिती मिळाल्याचा दावा केला.

“माझ्यावर जे आरोप केले जात आहेत, त्यावर मी फौजदारी गुन्हे दाखल केले तर आरोप करणाऱ्यांना जेलची हवा खावी लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला. “मी मागे लागलो तर तुमची अनेक प्रकरणं बाहेर येतील,” असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

धनंजय मुंडे यांना उद्देशून बोलताना जरांगे म्हणाले, “रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? संतोष भैया देशमुख यांना अजून न्याय मिळालेला नाही. अशा लोकांना मंत्रिपद देण्याचा प्रश्नच नाही.” या वक्तव्यामुळे वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी सरकारलाही इशारा दिला. “फडणवीस, शिंदे आणि विखे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण दिले आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून जीआरची अंमलबजावणी होत नाही. सरकार मोठं की अधिकारी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिंदे समितीला मुदतवाढ दिल्यानंतरही नोंदी शोधण्याचे काम का होत नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

“व्हॅलिडिटी प्रमाणपत्रे जाणूनबुजून रोखली जात आहेत. सारथी आणि अण्णासाहेब विकास महामंडळासंदर्भातील मुद्देही आम्ही मांडले आहेत. या अधिवेशनानंतर आम्ही ऐकणार नाही. पुन्हा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली, तर सरकार अडचणीत येईल,” असा इशाराही जरांगे यांनी दिला.

एकूणच, मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यासोबतचे राजकीय आरोप-प्रत्यारोप पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni Kalbhor: कदमवाकवस्ती येथील फ्लॅट चोरट्यांनी भरदिवसा फोडला, रोख रकमेसह सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Wednesday, 18 February 2026, 11:45

Mumbai News: कोस्टल रोडवरचं ‘जय हो’ गाणं ठरतंय डोकेदुखी? रहिवाशांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

Wednesday, 18 February 2026, 11:40

Pune News: शिवजयंतीनिमित्त पुण्यातील PMPML मार्गांत बदल; पाहा तुमच्या बसचा ‘नवा रूट’

Wednesday, 18 February 2026, 11:16

Pune News: दुचाकी चोरीचा तपास करताना पोलीसही चक्रावले! दोन अल्पवयीन मुलांचे मोठे ‘कांड’ उघड

Wednesday, 18 February 2026, 11:01

सस्पेन्स संपला! श्रीनाथ भिमाले होणार पुण्याचे नवे स्थायी समिती अध्यक्ष

Wednesday, 18 February 2026, 10:46

Bus Accident : काळ आला होता पण वेळ आली नव्हती! 30 प्रवाशांनी भरलेली बस उलटली, खिडकीतून मृत्यूला दिली हुलकावणी

Wednesday, 18 February 2026, 10:33
Next Post

Today's Horoscope: आजचा बुधवार तुमच्यासाठी कसा असेल? 18 फेब्रुवारीचे सविस्तर राशिभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.