मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (Eknath Shinde) निकालाने राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडवली आहे. सुरुवातीला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असे (Mumbai Mahapalika Election Result) चित्र असताना मतमोजणी जसजशी पुढे सरकत गेली, तसतसे ठाकरे बंधूंचे आकडे वाढू (Devendra Fdanavis) लागले आणि काँग्रेसने 20 पेक्षा अधिक जागा जिंकत थेट ‘किंगमेकर’ची भूमिका घेतली. या साऱ्या घडामोडींमुळे (Maharashtra Politics) मुंबईचा निकाल त्रिशंकू अवस्थेत गेला आणि याच क्षणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय गुगली टाकत महापौरपदावर दावा ठोकला. (Latest Marathi News)

विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आता मुंबई महापालिकेच्या निकालाकडे पाहून स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मुंबईत आम्हाला अडीच वर्षांसाठी महापौरपद हवे आहे.” महायुतीत भाजप मोठा भाऊ असतानाही शिवसेनेने थेट महापौरपदाची मागणी करून भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाली तेव्हा पहिल्यापासूनच भाजप आणि ठाकरे बंधूंच्या आघाडीत जोरदार चुरस दिसत होती. दुपारपर्यंत महायुती शतकाच्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत होते. मात्र दुपारी चारनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यांमधून निकाल यायला लागले आणि त्यांचा आकडा झपाट्याने वाढला. त्याचवेळी काँग्रेसने 22 पेक्षा जास्त जागा जिंकत सत्ता स्थापनेत निर्णायक भूमिका बजावण्याची तयारी दाखवली. आश्चर्य म्हणजे एमआयएमनेही मुंबईत 8 नगरसेवक निवडून आणत समीकरणात आपली उपस्थिती ठळक केली.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मुंबईतील यशाचा दाखला देत महापौरपदावर दावा सांगितला. ठाण्यात आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले असून मुंबईतही आम्ही बहुमताच्या जवळ आहोत, असे ते म्हणाले. मात्र ‘मुंबईत भाजपचाच महापौर होईल’ असे म्हणणे त्यांनी टाळले आणि मुद्दामहून “महायुतीचा महापौर होईल” एवढेच सूचक वक्तव्य केले.
मुंबईच्या सत्तासंघर्षात आता महापौरपदावरून महायुतीतच रस्सीखेच सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील काही दिवसांत मुंबईचा कारभारी कोण होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







