Yawatmal : अलीकडे प्रेमसंबंध, अनैतिक नातेसंबंध आणि संशयातून खून-आत्महत्यांसारखे प्रकार सतत समोर येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा (खु.) गावातही असाच एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका पतीने गावातीलच युवकाची हत्या केल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. Yawatmal

मृत युवकाचं नाव विशाल जगन रंदई (37) तर आरोपीचं नाव निलेश अरुण ढोणे (35) असं आहे. गावात गेल्या दोन वर्षांपासून विशाल आणि निलेशच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंध असल्याची चर्चा होती. पत्नीच्या वागणुकीवरून निलेशलाही या संबंधाचा संशय येत होता. या मुद्द्यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते.
शेवटी संशय पक्का झाल्यावर निलेशने विशालला गावाबाहेरच्या एकांत ठिकाणी बोलावलं. तिथे दोघांमध्ये तापलेल्या वातावरणात भांडण झालं. रागाच्या भरात निलेशने लाकडी दांड्याने विशालवर जोरदार प्रहार केले. गंभीर जखमी झालेला विशाल जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी निलेश ढोणे याला अटक केली. सध्या हे प्रकरण घाटंजी पोलीस ठाण्याकडून तपासात आहे.







