Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yawat : दौंड तालुक्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी व ‘ब’ वर्ग दर्जा; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 27 February 2026, 16:54
Yawat

photo- ppn

Yawat : दौंड तालुक्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी आणि भाविकांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार ॲड. राहुल कुल यांनी विधानसभेत केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. राहू येथील श्री शंभू महादेव मंदिर, कुसेगावचे भानोबा देवस्थान आणि नारायण बेट (देऊळगाव गाडा) या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देऊन त्यांच्या विकासासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. (Yawat)

 

विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून आमदार राहुल कुल यांनी मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांचा प्रश्न आक्रमकपणे मांडला. यावेळी त्यांनी केवळ या तीनच नव्हे, तर केडगावचे पद्मावती माता मंदिर, रोटीचे रोटमलनाथ मंदिर आणि राजेगावचे राजेश्वर मंदिर या देवस्थानांच्या विकासासाठीही तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

आमदार कुल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सांगितले की, “दौंडमधील या तीर्थक्षेत्रांचे महत्त्व मोठे असून भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. राहू, कुसेगाव आणि नारायण बेट या देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याबाबतच्या प्रस्तावातील त्रुटी जिल्हा परिषदेकडून तातडीने दूर केल्या जातील. या प्रत्येक देवस्थानाला बळकटी देण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी शासन देईल.” याव्यतिरिक्त, नारायण बेट येथील वनक्षेत्रातील जागा आणि पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयाकडून मिळणारा भाविकांच्या संख्येचा दाखला यांसारख्या तांत्रिक बाबी तातडीने निकाली काढण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

आमदार राहुल कुल यांनी यावेळी दौंडमधील इतर ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांनाही ‘ब’ वर्गात समाविष्ट करून घेण्याची मागणी लावून धरली. केडगाव, रोटी आणि राजेगाव येथील प्रस्तावांची पडताळणी करून निकषात बसणाऱ्या सर्व देवस्थानांना न्याय दिला जाईल, असे आश्वासनही यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून देण्यात आले.

“मतदारसंघातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केवळ दर्जा वाढवणे आमचे उद्दिष्ट नसून, त्या ठिकाणी येणाऱ्या लाखो भाविकांना रस्ते, पाणी आणि भक्तनिवास यांसारख्या सर्व पायाभूत सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी हा प्रयत्न आहे. सरकारने दिलेल्या प्रत्येकी कोटींच्या निधीमुळे या देवस्थानांच्या विकासाला मोठी गती मिळेल.”

-आमदार राहुल कुल

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35
Next Post
Pune

Pune : आयसीयू बेडच्या कमतरतेवर कायमस्वरूपी तोडगा; राज्य सरकारचा '१० वर्षांचा मास्टरप्लॅन' तयार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.