यवत, राहुलकुमार अवचट

Yawat : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चौफुला येथील हॉटेल जगदंबा समोर आज गुरुवार सकाळी 9.45 च्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो व तीन स्पोर्ट बाईकची धडक झाल्याने एकाचा जागेचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले असून पुणेहून सोलापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर एम.एच. 42 बी. एफ 5808 टेम्पो चालकाने अचानक टेम्पो वळविल्याने पाठीमागून येणाऱ्या एम. एच.12 पी.जे.5812, एम. एच. 14 जी.जी.6846 व एम.एच.03 ई यु.5905 या
3 स्पोर्ट बाईकची टेम्पोला जोरदार धडक बसली यावेळी स्पोर्ट बाईक वर असलेले सेहयाग नरबाल राजपूत ( वय 24 वर्षे, रा. कोयाळी , ता. खेड, जि.पुणे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोन स्पोर्ट बाईकवर असलेले इशांत विनोद राजपुत व विकेश कमलेश राजपुत हे दोघे जखमी झाले असून याबाबत फिर्याद सनी नरबाल राजपूत यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिली असून टेम्पो चालक भागवत बालाजी धर्मकर (रा. सावरगाव निपानी, पो. अंबुलगा ,ता. कंधार, जि. नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असेल याबाबत पुढील तपास ग्रेपोसई रजपुत हे करत आहेत






