Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : नोंदणीनंतर २४ तासांत पक्षकारांना मिळणार दस्त ; नोंदणी शुल्क व मुद्रांक महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांचे आदेश …!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 13 November 2022, 15:57

पुणे : भाडेकरारासाठीचे ‘लीव्ह अँड लायसेन्स’ आणि बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात ऑनलाइन दस्तनोंदणी झाल्यानंतर २४ तासांत दस्त मिळणार आहे. त्यामुळे ग्राहक, पक्षकार; तसेच बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

या संदर्भात नोंदणी शुल्क व मुद्रांक महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी आदेश जारी केले आहेत.

राज्यात दस्त नोंदणीसाठी ‘ई-रजिस्ट्रेशन’ची सुविधा २०१४ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन सुविधेमुळे बांधकाम व्यावसायिकांसह नागरिकांना त्यांच्या सदनिकेच्या पहिल्या विक्रीचा; तसेच ‘लीव्ह अॅन्ड लायन्सस’चा दस्त नोंदणीसाठी ऑनलाइन दाखल करता येतो.

 

दुय्यम निबंधकांना संगणक प्रणालीद्वारे प्राप्त झालेला दस्त तपासून त्याची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करणे शक्य झाले आहे. बांधकाम व्यावसायिकांसह नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात न येता दस्त नोंदणीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करता येत असल्याने त्या सुविधेला राज्यात प्रतिसाद मिळत आहे.

यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची गर्दी कमी झाली. त्यामुळे दुय्यम निबंधकांना इतर दस्तांच्या नोंदणीकडे लक्ष देणे शक्य झाले. परिणामी, कामाचा दर्जा सुधारण्यास मदत झाली.

मागील तीन वर्षांपासून ऑनलाइन नोंदविलेले दस्त २४ तासांत बांधकाम व्यावसायिकांसह ग्राहकांना मिळावेत, अशी मागणी ‘असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्स’मार्फत करण्यात येत होती.

नोंदणी शुल्क व मुद्रांक महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन असोसिएशनने त्यांचे लक्ष वेधले. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

असोसिएशनच्या वतीने सचिन संघवी, मंगेश पाटील, योगेश पंपालीया, उमाशंकर यादव, राजेंद्र दोशी, रवींद्र चौकसे, अनिल पाटील यांनीही या प्रकरणात पाठपुरावा करण्यासाठी परिश्रम घेतले.

दरम्यान, ई-रजिस्ट्रेशन प्रणालीमधून नोंदणीसाठी दाखल होणाऱ्या प्रथम विक्री करारनामे आणि लीव्ह अँड लायसेन्स करारनामे दस्तांची नोंदणी त्याच दिवशी किंवा अपरिहार्य परिस्थितीत पुढील कामकाजाच्या दिवशी पूर्ण होईल, याची दक्षता सर्व नोंदणी अधिकाऱ्यांनी घ्यावी.

कोणत्याही परिस्थितीत वेळेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित दुय्यम निबंधकावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे आदेश नोंदणी महानिरीक्षक हर्डीकर यांनी दिले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

बनावट चाव्यांचा वापर करत नोकरानेच घातला मालकाला गंडा ; दीड कोटी रुपयांचा ऐवज लंपास...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.