Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! ‘तुला रोजगार मिळवून देतो’ सांगत सासरच्यांनी विधवा सुनेला गुजरातला विकलं; दोन वर्ष शारीरिक अन् मानसिक छळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 24 July 2025, 19:09

यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत धक्कादायक आणि अमानवी घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. पती आणि मुलाच्या आकस्मिक मृत्यूनंतर आधीच दुःखद अवस्थेत असलेल्या एका 42 वर्षीय विधवा महिलेसोबत तिच्या सासरच्या लोकांनी जे कृत्य केलं, ते माणुसकीला काळिमा फासणारं आहे.

 

महिलेचा नवरा आणि लहान मुलगा यांचा काही काळापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या वेळी तिच्या सासरच्यांनी तिला आधार देण्याऐवजी तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. रोजगार देतो, नवा संसार उभारतो, अशा आश्वासनाच्या बहाण्याने तिला मध्य प्रदेशात नेण्यात आलं. पण खरी योजना वेगळीच होती.

महिलेच्या नणंद आणि नणंदेच्या नवऱ्याने मिळून तिला गुजरातमधील मोरंबी जिल्ह्यातील हिरापूर येथील सुरेश पोपटभाई चौसानी (वय 48) नावाच्या व्यक्तीकडे तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांना विकलं. सुरेशने या महिलेशी लग्न केल्याच्या बहाण्याने तब्बल दोन वर्षे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या अत्याचारातून तिला मूल देखील झालं. त्यानंतर सुरेशने तिला तिच्या गावी आणून सोडलं आणि स्वतः फरार झाला.

या प्रकरणात आरोपींमध्ये सासू दर्शना (60), तिचा दुसरा पती गणेश नामदेव भेले (65), दीर संदीप सुभाष सुरजोशे (40), नणंद पूजा पाटीदार (38) व तिचा नवरा जितेंद्र पाटीदार (45) यांचा समावेश आहे. तसेच गुजराती व्यक्ती सुरेश पोपटभाई चौसानीलाही आरोपी करण्यात आलं आहे. सर्वांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या महिलेला 2023 साली बेपत्ता झाल्याची तक्रार आर्णी पोलिसात दाखल करण्यात आली होती. पोलीस तपास सुरु असतानाच महिलेला परत आणण्यात आलं. त्यानंतर तिच्या जबाबातून सर्व प्रकार उघड झाला आणि पोलिसांसमोर थरकाप उडवणारी माहिती आली.

या प्रकारानंतर यवतमाळ पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संबंधित आरोपींना अटक केली आहे. गुन्हेगारी कृत्य, फसवणूक, महिलेशी फसवून विवाह, शारीरिक आणि मानसिक छळ, आणि मानव विक्री यासारख्या गंभीर कलमांतर्गत कारवाई सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास अधिक खोलात जाऊन केला जात असून, आणखी काही धक्कादायक तथ्य समोर येण्याची शक्यता आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post

Pune News: वडगाव काशिंबेगमध्ये तिन बिबट्यांचा थरार; सतर्कतेमुळे वासरू थोडक्यात बचावले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.