पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिकेच्या (PMC) बंडगार्डन जलवितरण विभागाने काही तातडीच्या कामांसाठी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शहरातील रहिवाशांना पाण्याची बचत करावी लागणार आहे. पाणीपुरवठा यंत्रणेतील काही महत्त्वाच्या ठिकाणी त्वरित दुरुस्तीची गरज असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. अधीक्षक अभियंता लप्कर यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे आणि शक्य असल्यास पाणी साठवून ठेवावे. तसेच, या दुरुस्ती कामांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या अत्यंत गरजेच्या कामांमुळे गुरुवार, 18 डिसेंबरला संबंधित भागात पाण्याची लाइन पूर्णपणे बंद राहील. तसेच, 19 डिसेंबर, शुक्रवारी पाणी पुरवले जाईल.

महापालिकेचे आवाहन:
येरवडा, संगमवाडी, टिंगरेनगर, खराडी, चंदननगर, सोमनाथनगर, विमाननगर, विद्यानगर, वडगावशेरी, लोहगाव, विश्रांतवाडी, नागपूरचाळ, कल्याणीनगर, धानोरी, कलवड, प्रतिकनगरचा (अंशतः), कस्तुरबा वसाहत, मोहवाडी आणि जाधवनगर या मोठ्या भागातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.







