Pune News: पुणे : वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्यसराकार कडून ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात कडक निमयमावली जारी करण्यात आले आहे. परिवहन विभागाने चालक प्रशिक्षण आणि परवाना चाचणीतील त्रुटी दूर करून गुणवत्तापूर्ण चालक तयार करण्यावर भर दिला आहे. यासाठी नव्या मार्गदर्शक सूचनांची घोषणा करण्यात आली असून, पक्क्या लायसन्ससाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेणे सक्तीचे करण्यात आले आहे.

हेही वाचा- बार्शी-सोलापूर मार्गावर भीषण अपघात; आजोबा आणि दोन वर्षांच्या नातवाचा मृत्यू
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार प्रत्येक व्यवहारात पारदर्शकता राहण्यासाठी सीसीटीव्ही सर्व्हेलियन्स अनिवार्य करण्यात आले आहे. ‘Automated Driving Test Track’ प्रकल्प पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या चाचणी मार्गावरही हीच कडक निगराणी राहणार आहे. चाचणीचे संपूर्ण रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवून तपासणी समितीकडे सुपूर्द करणे प्रत्येक कार्यालयासाठी अनिवार्य आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे राज्यात अपघात होत आहे. याचे प्रमाण देखील ८० % हून जास्त असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे परवाना चाचणी अधिक काटोकोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चाचणीत अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण 10% पेक्षा कमी असेल तर संबंधित RTO अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष ठेवणे बंधनकारक केले गेले आहे. तसेच उत्तीर्ण झालेल्या एकूण अर्जदारांपैकी 5% जणांची पुन्हा चाचणी घेऊन त्याचा अहवाल महिन्याच्या शेवटी सादर करावा लागणार आहे.
परिवहन विभागाने जारी केलेल्या सूचनांनुसार –
-
पक्क्या लायसन्ससाठी सर्व अर्जदारांनी ऑनलाईन अपॉईंटमेट घेणे अनिवार्य.
-
एका दिवसात किती वाहनांची चाचणी होणार आणि कोणत्या वाहन प्रकारासाठी किती वेळ दिला जाणार, याचे वेळापत्रक कार्यालयांना पाळावे लागणार.
-
चाचणीसाठी नियुक्त अधिकारी मैदानावर उपस्थित राहणे बंधनकारक, तसेच चाचणी झाल्यानंतर प्रत्येक अर्जाची स्वतंत्र नोंद करण्यात येणार.
-
परवाना प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा सर्विस गॅरेंट अंतर्गत ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे संबंधित अधिकाऱ्यांसाठी सक्तीचे.
-
चाचणी मार्गावर सीसीटीव्ही मॉनिटरींग अनिवार्य असून, कोणतीही त्रुटी किंवा अव्यवस्था आढळल्यास तत्काळ शिस्तभंगाची कारवाई होणार.
-
निरीक्षक किंवा कर्मचाऱ्यांनी प्रक्रिया बिघडवली किंवा गैरव्यवहार केला तर कठोर कारवाई केली जाणार आहे.
-
परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया अधिक सुरक्षित, काटेकोर आणि पारदर्शक बनण्याची अपेक्षा आहे.






