Pune Drugs Seized : पुणे: पुण्यातील लोहगाव विमानतळावर पोलिसांनी मोठी कारवाई करत 2.29 कोटी किंमतीचा गांजा जप्त केला आहे. Air Intelligence Unit (AIU) ने सोमवारी दि. 8 डिसेंबर रोडी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. (Pune Drugs Seized)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त माहिती मिळताच विमानतळ परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात आला. त्यानंतर बँकॉकवरूनआलेल्या IndiGo 6E-1096 या विमानातील एका संशयित प्रवाशाची तपासणी करण्यात आली. चेक-इन बॅगेची तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना दोन एअरटाईट पिशव्यांमध्ये ठेवलेला 2,299 ग्रॅम गांजा सापडला. या घटनेनंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी जप्त केलेल्या या अमली पदार्थांची बाजारमूल्य अंदाजे 2.29 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.
AIU अधिकाऱ्यांनी तत्काळ त्या प्रवाशाला ताब्यात घेतले आणि त्याला अटक केली. त्यानंतर हा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी दस्तऐवजीकरण करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची नोंद पुणे विमानतळ पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
अधिकाऱ्यांच्या जलद कारवाईमुळे विमानतळावरील मोठी तस्करी रोखण्यात यश आले आहे.






