Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात महिलेकडून तक्रार दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 16 August 2025, 16:41

पुणे: खराडी पार्टी प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला असून एकनाथ खडसे यांचे जावई डाॅ. प्रांजल खेवलकर यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 77 आणि माहिती-तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 66 (ई) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

25 जुलै रोजी खराडीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीवर गुन्हे शाखेने छापा टाकला होता. या छाप्यात डाॅ. प्रांजल मनीष खेवलकर यांच्यासह निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महमंद सय्यद, सचिन सोमाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, इशा देवज्योत सिंग आणि प्राची गोपाल शर्मा यांना अटक करण्यात आली होती. या वेळी पोलिसांनी 2 ग्रॅम 70 मिलीग्रॅम कोकेन, 70 ग्रॅम गांजासदृश पदार्थ, हुक्का सेट, 10 मोबाईल, सुगंधी तंबाखू, दोन गाड्या, मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला होता. आरोपींना न्यायालयाने येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.

पोलिस तपासात आरोपींनी एप्रिल व मे महिन्यातही अशा प्रकारच्या पार्ट्यांचे आयोजन केले असल्याचे उघड झाले. आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाइलमध्ये महिलांशी झालेल्या संवादांचे रेकॉर्ड, पार्टीतील छायाचित्रे आणि व्हिडिओ आढळून आले आहेत. या प्रकरणाबाबत एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर महिला आयोगाने पुणे पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. आयोगाकडून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना याबाबत अधिकृत पत्र देण्यात आले आहे.

2022 ते जून 2025 या कालावधीत डाॅ. खेवलकर यांनी विविध हॉटेलमध्ये एका महिलेला बोलावून तिची संमती न घेता निर्वस्त्र अवस्थेतील छायाचित्रे काढली, असा धक्कादायक आरोप त्या महिलेने केला आहे. या छायाचित्रांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने तिने नुकतीच सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी डाॅ. खेवलकर यांचा दुसरा मोबाइल, कॅमेरा, लॅपटॉप तसेच संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज असलेले डीव्हीआर ताब्यात घेतले आहे. उर्वरित सहा आरोपींचे मोबाइल व पेन ड्राईव्ह जप्त करून त्याचा तांत्रिक तपास सुरू आहे.

या नव्या तक्रारीमुळे खराडी पार्टी प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, डाॅ. खेवलकर यांच्याविरुद्धचा तपास आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोर पोलिसांचा हातभट्टी विक्रीच्या अड्ड्यावर छापा; 490 लिटरचा साठा जप्त तर दोघे जेरबंद

Wednesday, 8 April 2026, 18:44

मैत्रीचं अनोखं ऋण! कस्तुरी ग्रुपतर्फे दिवंगत शंकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘रुग्णवाहिका’ अर्पण

Wednesday, 8 April 2026, 18:38
Horrible incident in a renowned IT company! He used to laugh at young women; asked women to wear hijab and offer prayers and tortured them...

नामांकित IT कंपनीत भयंकर प्रकार! तरुणींकडे पाहून हसायचा; महिलांना हिजाब घालून नमाज पढायला सांगितलं अन् अत्याचार करत…

Wednesday, 8 April 2026, 18:33

धक्कादायक! मोराची चिंचोली वॉटरपार्कमध्ये मोठी दुर्घटना; वॉटर राईडवेळी महिलेचा भीषण अपघात, प्रकृती चिंताजनक

Wednesday, 8 April 2026, 17:57

धरणगाव हादरलं! संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् पतीने पत्नीवर केले एकामागून एक 13 वार; अंगावर काटा आणणारा थरार!

Wednesday, 8 April 2026, 17:47

बारामतीचा रणसंग्राम! 55 उमेदवार रिंगणात अन् काँग्रेसचं “धनगर कार्ड”; सुनेत्रा पवारांच्या मदतीसाठी फडणवीस मैदानात

Wednesday, 8 April 2026, 17:40
Next Post

चहाप्रेमींनो सावधान..! 'या' चुका टाळा नाहीतर चहा बनू शकतो आरोग्यासाठी घातक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.