Pune Accident: पुणे: पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. काल मध्यरात्री गरवारे कॉलेज चौकात एक भीषण अपघात (Accident) घडला. भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने कारला धडक दिली. या घटनेमुळे रस्त्यावर एकच खळबल उडाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून एका कारचे भरपूर नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार,गरवारे चौकात मध्यरात्रीच्या सुमारास गरवारे चौकात एका दुचाकीची कारला धडक लागल्याने अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. दुचाकी वेगात असल्याने तीचे नियंत्रण सुटले आणि समोर असणाऱ्या कारला धडकली. हा अपघात इतका भयंकर होता. त्यामुळे कारचे आणि दुचाकीचे भरपूर नुकसान झाले. दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात कारचालक देखील किरकोळ जखमी झाला आहे.
या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाला होता. अपघाताची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे पोलीस पुढील तपास करत आहे.







