Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri-Chinchwad News: लाचखोर परिमंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात! रेशन कार्डसाठी 16 हजारांची लाच घेताना भोसरीत रंगेहात अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 December 2025, 20:22

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad News) भोसरी अन्न नागरी पुरवठा कार्यालयात (Pune Crime) लाच घेतल्याप्रकरणी परिमंडळ (Pune News) अधिकारी गजानन देशमुख यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. तक्रारदार हे अपंग असून समाजकार्य करतात. त्यांना शासकीय कागदपत्रांची माहिती असल्याने ते आपल्या 14 ओळखीच्या लोकांसाठी रेशन कार्ड काढण्यासाठी मदत करत होते. प्रत्येक व्यक्तीने 50 रुपये शासकीय फी आणि अधिकारपत्र दिल्यानंतर तक्रारदारांनी सर्व 14 जणांचे प्रस्ताव तयार करून आवश्यक कागदपत्रे जोडली. ऑनलाइन फी भरल्यानंतर सर्वांना रेशन कार्डचे N नंबर मिळाले. (Breaking News)

 

त्यानंतर तक्रारदारांनी हे रेशन कार्ड मिळवण्यासाठी भोसरी अन्न नागरी पुरवठा विभागातील परिमंडळ अधिकारी गजानन देशमुख यांची भेट घेतली. देशमुख यांनी प्रत्येक रेशन कार्डासाठी 900 रुपये प्रमाणे 12,600 रुपये लाच मागितली. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 10 डिसेंबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दाखल केली.

11 डिसेंबर 2025 रोजी पडताळणीदरम्यान देशमुख यांनी 14 रेशन कार्डांसाठी सुरुवातीला 19,000 रुपये मागितले. 10 कार्डांसाठी प्रत्येकी 1,500 रुपये आणि उर्वरित 4 कार्डांसाठी प्रत्येकी 1,000 रुपये अशी मागणी होती. तडजोडीनंतर त्यांनी 16,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे स्पष्ट झाले. त्याच दिवशी लाचलुचपत विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून 16,000 रुपये स्वीकारताना गजानन अशोकराव देशमुख यांना दुपारी 2.19 वाजता त्यांच्या भोसरी कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त आणि पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. या घटनेमुळे पुरवठा विभागातील लाचखोरीचे आणखी एक प्रकरण उघड झाले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Next Post
Pune News: In Pune, a man used to molest and molest women on deserted streets at night and then flee; Police set a trap and arrested the accused.

Pune News: पुण्यात रात्री सुनसान रस्त्यावर महिलांची छेड काढायचा, विनयभंग करून पसार व्हायचा; पोलिसांकडून सापळा रचून आरोपीला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.