Navale Bridge Accident: पुण्यात काल संध्याकाळी नवले पुलावर भीषण अपघात झाला. या घटनेनंतर पुणे शहरात एकच खळबळ उडाली. भरधाव कंटेनरचे ब्रेक झाल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात कंटेनरने तब्बल 22 गाड्यांना चिरडलं. या भीषण घटनेत 8 जणांनी जीव गमावला तर 30 हून अधिक लोक जखमी झाले. या अपघातात कंटेनर आणि ट्रकमध्ये एक कार अडकली. या कारमधील सर्व प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. (Pune Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या राजस्थान पासिंग कंटेनरचे ब्रेक फेल झाले. गाडी अनियंत्रित झाल्यानंतर हा भीषण अपघात घडला. या अपघातात समोर असलेल्या वाहनांना धडक दिली. पुढे कंटेनरने कारला धडक दिली आणि पुढे जाऊन एका कारला आदळली. या दोन्ही गाड्यांच्या धडकेत कारमध्ये अडकली. सीएनजीची कार असल्यामुळे लगेच पेट घेतला.
कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्यास मुश्किल झाले त्यामुळे कारमध्ये प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
कारमध्ये स्वाती नवलकर, शांता दत्तात्रय़ दाभाडे (54), दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे (वय 58 वर्षे राहणार सत्यसाई अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक 10, धायरी फाटा पुणे), मोक्षिता हेमकुमार रेड्डी (वय 03 वर्ष, B 301, पॅराडाईज वन, स्वराज कॅपिटल जवळ, लक्ष्मी चौक, चिखली पुणे), कारचालक धनंजय कुमार कोळी ( वय 30 वर्ष, राहणार सोनवणे वस्ती चिखली पुणे मुळगाव जयसिंगपूर)
घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरु केला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातामुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरलं आहे.







