पुणे: राज्यात तपोवनातील (Maval News) वृक्षतोडीवरून गदारोळ सुरू असतानाच (MLA Sunil Shelke) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून आणखी एक (Pune News) वादग्रस्त प्रकरण समोर आले आहे. मावळ तालुक्यातील नानोली येथील वनीकरणासाठी आरक्षित जमिनीत विनापरवाना उत्खनन करून हजारो झाडांची कत्तल करण्यात आल्याचा गंभीर आरोप उद्योजक रणजित काकडे यांनी केला आहे. ही जमीन आमदार सुनील शेळके यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Breaking News)

आरोप काय?
रणजित काकडे यांनी सांगितले की, नानोली परिसरातील संबंधित जमीन ही वनीकरणासाठी आरक्षित श्रेणीत येते. अशा जमिनीत कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उत्खनन करता येत नाही. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करण्यात आले असून झाडांची तोड झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हे उत्खनन आमदार सुनील शेळके यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जमिनीत झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Pune Illegal Excavation)
महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे मावळ तालुक्यातील अवैध उत्खनन प्रकरण नुकतेच विधिमंडळ अधिवेशनात गाजले होते. याच प्रकरणावर आमदार सुनील शेळके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानंतर महसूल विभागाने मोठी कारवाई करत 4 तहसीलदार आणि 10 तहसील अधिकाऱ्यांचे निलंबन केले होते. आता याच पार्श्वभूमीवर आमदारांच्या कुटुंबीयांच्या जमिनीवरील कथित उत्खनन प्रकरणावर महसूल विभाग काय भूमिका घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Latest Breaking News)
सुनील शेळकेंच्या राजीनाम्याची मागणी
या प्रकरणात प्रशासनाकडून सखोल चौकशी होणार का, दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रणजित काकडे यांनी असा आरोपही केला की, संवैधानिक पदावरील विश्वासाचा गैरफायदा घेत आमदारांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चुकीची माहिती दिली. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांच्या जमिनीवरील अनधिकृत उत्खननाचा प्रकार महसूल विभागाने गांभीर्याने घ्यावा आणि तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रणजित काकडे यांनी केली आहे.





