Loni Kalbhor Crime: लोणी काळभोर, ता. 17 : धारदार शस्त्रासह दंगा करून वाहनांची तोडफोड केल्याची घटना हडपसर परिसरात सन 2022 साली घडली होती. मागील तीन वर्षापासून गुंगारा देणाऱ्या या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पोलिसांची अखेर अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दत्तात्रय उर्फ दत्ता अर्जुन काशिद (वय 34, रा. अंबर नाथ मंदीरा शेजारी, तरवडी रोड, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट सहाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय उर्फ दत्ता काशिद याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता 143, 147,148, 149, 427,504 आर्म एक्ट 4 (25), म पो का 37(1),(3), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 3,7 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी हा पोलिसांना चकवा देत होता. फरार आरोपींचा शोध गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक घेत होते.
पथकातील पोलिस हवालदार नितीन मुंडे व कानिफनाथ कारखिले यांना दंगा व वाहनांची तोडफोडी च्या गुन्ह्यातील आरोपी हा हडपसर परिसरात येणार आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला. या सापळ्यात आरोपी दत्तात्रय उर्फ दत्ता काशिद अलगत अडकला. आरोपी काशिद याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्याला हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.




