Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jaydutt Kshirsagar : हल्ल्यामागच्या ‘त्या’ मास्टरमाईंडला शिक्षा होणारच; जयदत्त क्षीरसागरांचे आव्हान

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 3 November 2023, 18:02

Jaydutt Kshirsagar : बीड : माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी चार दिवसांपूर्वी मराठा आंदोलनादरम्यान, बीडमध्ये त्यांच्या कार्यलयाला आणि घराला आग लावण्यात आली होती. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केलं. क्षीरसागर कुटुंब हे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहेत. यात त्यांचं किती नुकसान झालं, याबाबतची माहिती दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले की, ‘बीडचा इतिहास हा सर्व जातीधर्माचा आहे. तरीही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने अशी घटना घडणं ही अतिशय दुर्देवी बाब आहे. पोलीस, प्रशासन सर्व घटनेचा तपास करेल. त्यावर भाष्य करणं आता योग्य ठरणार नाही. या जाळपोळीमागे कोण मास्टरमाईंड आहे. कुठल्या जातीची लोकं आहेत, कुठल्या उद्देशाने आली होती हे सगळं समोर आलं आहे’, असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

असे प्रकार घडणं चिंतेची बाब

‘अशा घटना घडत असतील आणि असे पायंडे पडत असतील तर आज कोण सुरक्षित आहे? तर मला वाटतं की ही अतिशय चिंतनीय बाब आहे. प्रशासनाने ही बाब सरकारच्या कानावर टाकली आहे. आता सगळ्या गोष्टी समोर येतील, असं मला वाटतं’, अशी प्रतिक्रिया जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.

 

गुन्हेगाराला शिक्षा होणारच

‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी सगळ्या गोष्टी विशद केल्या. बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनांवर त्यांनी प्रसारमाध्यमांना देखील प्रतिक्रिया दिलीय. कलम 307 आणि 436 ची कलम जिथे गरज आहे तिथे लावले जातील. कुणाही दोषी गुन्हेगाराला मोकळं सोडणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे आणि ती रास्त आहे’, असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

त्यावेळी ऑफिसमध्ये तीन कर्मचारी होते

‘या जाळपोळीत माझ्या ऑफिसचं फार नुकसान झालंय. तिथली गाडी जळाली आहे. घरच्या पाच ते सहा गाड्या जळाल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवाला धोका होता, घरात जावून मारणं. ऑफिसमध्ये तीन कर्मचारी होते. ते हात जोडत होते तरी त्यांना बाहेर पडू दिलं नाही. शेवटी ते तिथून उड्या मारुन पळाले. त्यांनाही जाळण्याचा प्रयत्न झाला’, अशी माहिती जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.

घरात सर्वजण होते

‘घराला आग लावली तेव्हा घरात सर्वजण होते. भूषण, त्याची पत्नी, योगेश, त्याची पत्नी, रवीची मुलं, संदीपची पत्नी, त्याची मुलं, हेमंत ही सर्वजण घरात होते. परिवाराचे एवढे सदस्य घरात असताना जाणीवपूर्वक पेट्रोल बॉम्ब फेकणं, दगड फेकणं आणि त्यांना कोंडून मारणं, हा प्रकार केवढा क्रूर आणि निष्ठूर होता. ब्रिटिशांच्या आणि निजामाच्या काळातही असे प्रकार झाले नाहीत. कितीही कुणीही असला तरी मास्टरमाईंड शोधून काढणं आणि त्यांना नियमाप्रमाणे शिक्षा देणं जरुरीचं आहे’, असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post
Salesman cheats jewellery shop owner in pune

Pune Crime: सराफ दुकानातील सेल्समनकडून कोट्यवधींची अफरातफर; व्यावसायिकांमध्ये खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.