मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा इतिहासाच्या मुद्द्यावरून (Devendra Fadanavis) इतिहासाशी छेडछाड आता खपवून घेणार नाही! टिपू सुलतान शिवरायांपेक्षा मोठे कसे? फडणवीसांचा विधानसभेत हल्लाबोल
तापलेले वातावरण पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडली. “टिपू सुलतान चांगला होता की नाही, हा वेगळा मुद्दा आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तो मोठा राजा होता, असे कोणी म्हणत असेल तर त्यावर आमचा आक्षेप आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान फडणवीस यांनी गेल्या अनेक दशकांत देशाच्या इतिहासाशी छेडछाड झाल्याचा आरोप केला. “आपल्याला वर्षानुवर्षे टिपू सुलतान महान होता, असे शिकवण्यात आले. पण त्याच्या कारकिर्दीत झालेल्या हत्याकांडांविषयी किंवा तो इंग्रजांविरोधात का लढला, याची पूर्ण माहिती देण्यात आली नाही,” असे ते म्हणाले. त्यांच्या मते, टिपू सुलतान इंग्रजांविरोधात स्वतःचे राज्य टिकवण्यासाठी लढला, हा संदर्भही इतिहासात ठळकपणे मांडला गेला नाही.
फडणवीस यांनी एनसीआरटीच्या पुस्तकांचा उल्लेख करत सांगितले की, पूर्वी मोगल साम्राज्याला मोठी जागा देण्यात आली होती, तर शिवाजी महाराजांविषयी मर्यादित माहिती होती. “आता नव्या बदलांनंतर मराठ्यांच्या इतिहासाला अधिक स्थान देण्यात आले आहे. योग्य वेळी संतुलित इतिहास शिकवला असता, तर आक्रमकांना कोणीही हिरो मानले नसते,” असे ते म्हणाले.
या वक्तव्यांमुळे सभागृहात जोरदार चर्चा रंगली. इतिहासाचे पुनर्मूल्यांकन, शालेय अभ्यासक्रमातील बदल आणि ऐतिहासिक व्यक्तींच्या तुलनेवरून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रभक्त मुस्लिमांविषयी त्यांना कोणताही आक्षेप नाही; मात्र देशाच्या विरोधकांचे गौरवगान स्वीकारले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.







