Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : भर वस्तीत रिव्हॉल्व्हर नाचवणं महागात पडलं! शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या घराबाहेर फिरणाऱ्या ‘त्या’ दोन पोलिसांचे निलंबन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 January 2026, 17:13
Crime News

photo- social media

Crime News : महापालिका निवडणुकीच्या गडबडीत लोकशाहीला धक्का देणारा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या एका उमेदवाराच्या घरासमोर पोलिस गणवेशात, हातात रिव्हॉल्व्हर घेऊन फिरणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी अखेर त्या दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. (Crime News)

 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस यंत्रणाच अडचणीत आली असून, शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सुहास शिरसाठ आणि अन्य दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीसारख्या संवेदनशील काळात पोलिसांकडून शस्त्रांचा निष्काळजी वापर होत असल्याचा आरोप केला जात आहे.

कर्तव्यात हलगर्जीपणा उघड

अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना सुरक्षा देणारे नीलेश भालसिंग आणि राघवेंद्र भालसिंग हे दोन पोलिस कर्मचारी आपलं कर्तव्याचं ठिकाण सोडून बोल्हेगाव परिसरात गेले होते. तसंच त्यांनी रिव्हॉल्व्हर अतिशय बेफिकीरपणे हाताळल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. ही बाब गंभीर असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तात्काळ निलंबनाचे आदेश दिले.

व्हिडीओ व्हायरल, वातावरण तापलं

शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्स (ट्विटर)वर हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये एका पोलिसाच्या हातात रिव्हॉल्व्हर स्पष्ट दिसत असून तो थेट उमेदवाराच्या घरासमोर उभा असल्याचा आरोप करण्यात आला. हा लोकशाही प्रक्रियेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचंही सांगण्यात आलं.

खासदार निलेश लंके आक्रमक

या प्रकरणाची दखल घेत खासदार निलेश लंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तातडीने कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर काही तासांतच संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितलं की, सुरक्षेवर असलेल्या पोलिसांनी शस्त्र निष्काळजीपणे हाताळल्याचं चौकशीत आढळून आलं आहे. त्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या इतर व्यक्तींवरही कारवाई व्हावी, अशी मागणी होत असून या घटनेमुळे अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. एका व्हायरल व्हिडीओमुळे पोलिस प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागल्याने ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोलापूर हादरलं! रात्रीतून पुतळा बसवला अन् दोन गट भिडले; बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे, आता थेट “मोक्का” लागणार?

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Next Post
Pune Crie:m 'Let's have a drinking competition', the bet got drunk; friends did not take the body to the doctor, but directly dumped it in the field...

Pune Crime: 'चल दारू कॉम्पिटिशन करू' बेटच्या नादात दारू झाली जास्त; मित्रांनी डॉक्टरकडे न नेता बॉडी डायरेक्ट शेतात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.