मुंबई: मुंबईतील कांदिवली (पश्चिम) येथील लालजी पाडा भागात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. शेजारी राहणाऱ्या एका 16 वर्षांच्या मुलाने एका 5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना, आरोपी तरुणाने तिला बोलवून घरात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. आरोपीच्या म्हणण्यानुसार, त्याने एक गोळी घेतली होती. त्या गोळीच्या प्रभावाने त्याचे डोके जड झाले आणि स्वतःवरील नियंत्रण सुटले. याच गुंगीच्या अवस्थेत आपण काय करत आहोत, याचे भान नसल्याने आपल्या हातून हे कृत्य घडले, असा दावा आरोपीने केला आहे. दरम्यान, आरोपी नराधमाने निर्दयीपणे चिमुरडीवर बलात्कार केला अत्याचारानंतर मुलीच्या खासगी अवयवातून मोठा रक्तस्राव होत असल्याचे दिसले मुलीसोबत काही अनुचित घडल्याचे समोर आल्यानंतर तिला उपचारांसाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
संतप्त नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षाव्हावी, अशी मागणी करत आंदोलन केले असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






