Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘डीजे टाळा, उत्सव शांततेत साजरा करा ‘ यवत पोलिसांचे आवाहन

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Sunday, 13 September 2026, 7:01

यवत : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलीस स्टेशनच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने यवत गावातून आज सायंकाळी रूट मार्च काढण्यात आला.
श्री काळभैरवनाथ चौक, मुख्य बाजारपेठ, गणपती चौक, चांदणी चौक, ब्राह्मण आळी, कदम आळी, अल्फा मस्जिद, जिल्हा परिषद शाळा या मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला असून यामध्ये १ पोलीस निरीक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक , ४ पोलीस उपनिरीक्षक , २० पोलीस अंमलदार व २५ होमगार्ड २५ असे पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील यवत, केडगाव, पारगाव व नानगाव येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी, शांतता व मोहल्ला कमिटी सदस्य, जातीय सलोखा कमिटी सदस्य, पोलीस पाटील व पत्रकार यांच्या बैठका घेण्यात आल्या असून या बैठकांना सुमारे ३०० ते ३५० नागरिक व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकांमध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त सूचनांबाबत उपस्थितांना माहिती देऊन गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

गणेश मंडप उभारताना आवश्यक परवानग्या घेणे, वाहतुकीस व आपत्कालीन मार्गास अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे, विद्युत व अग्निसुरक्षेच्या उपाययोजना करणे, CCTV यंत्रणा बसविणे, स्वयंसेवक नियुक्त करणे तसेच महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेस प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

ध्वनिक्षेपकाचा वापर शासनाने निर्धारित केलेल्या वेळ व ध्वनीमयदितच करावा. नागरिक, रुग्णालये, शाळा व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने मोठ्या आवाजात डीजे वाजवू नये, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच मिरवणुकीमध्ये लेझर लाईट, अत्यंत तीव्र प्रकाशझोत, धोकादायक वाहनप्रवास, शस्त्रे अथवा आक्षेपार्ह साहित्याचा वापर करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा, धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारे तसेच आक्षेपार्ह संदेश, फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत. सोशल मीडिया ग्रुपच्या ॲडमिन यांनी अशा पोस्टवर तात्काळ नियंत्रण ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी वसूल करणे, मद्यपान, जुगार, मटका अथवा अन्य बेकायदेशीर प्रकारांना थारा देऊ नये, तसेच संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा वस्तू आढळल्यास स्वतः कारवाई न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे पोलिसांनी सांगितले.

उत्सव आनंदाचा, जबाबदारी सुरक्षिततेची या भावनेने गणेशोत्सव साजरा करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. सूचनांचे उल्लंघन करणा-या मंडळांच्या पदाधिकारी अथवा संबंधित जबाबदार व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिला आहे.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अन् त्यानं विवाहित प्रेयसीवर सपासप वार केले! संबंध ठेवायला नकार देताच बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; आईसमोरच प्रेयसीला संपवलं….

Monday, 16 November 2026, 14:34

PMP चालकाने अचानक ब्रेक दाबला; सर्व प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले अन् महिलेचे ५ दात तुटले, नेमकं काय घडलं?

Monday, 16 November 2026, 14:30

पद नाही तर काम नाही! तक्रारवाडीतील गावपुढाऱ्यांची सध्याची अवस्था; गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणार कोण?

Monday, 16 November 2026, 14:04

विद्यार्थ्यांचा जीवघेणा होडी प्रवास थांबणार! निमसाखर-बांगर्डे पुलासाठी 25 कोटी मंजूर; दत्तात्रय भरणेंच्या पाठपुराव्याला यश

Monday, 16 November 2026, 13:25

भाडेकरूंची मनमानी थांबणार; घरमालकांना पोलिसांचा आधार! मुदत संपल्यानंतरही घराचा ताबा न देणाऱ्यांवर कारवाईचा मार्ग मोकळा

Monday, 16 November 2026, 13:20

माणुसकीला काळिमा! इंदापुरात नवजात बाळाला ओढ्याजवळ सोडले; सतर्क नागरिकामुळे वाचला जीव

Monday, 16 November 2026, 13:11
Next Post

सूर्यदेवाची विशेष कृपा! आज ‘या’ राशींचे नशीब चमकणार; मोठी इच्छा होणार पूर्ण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp